Nagpur Crime | कौटुंबिक कलह घेऊन पोहोचला ठाण्यात, तिथेच ह्रदविकाराच्या झटक्यानं युवकाचा मृत्यू

| Updated on: Dec 08, 2021 | 11:02 AM

पोलीस ठाण्यात असतानाच रवीच्या छातीत दुखायला लागले. त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पोलिसांनी रवीकडं पाहिले. दरम्यान, रवीला ह्रदयविकाराचा झटका आला. पोलिसांनी लगेच रवीला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी रवीला मृत घोषीत केले.

Nagpur Crime | कौटुंबिक कलह घेऊन पोहोचला ठाण्यात, तिथेच ह्रदविकाराच्या झटक्यानं युवकाचा मृत्यू
Follow us on

नागपूर : घरी आईसोबत वाद झाला. युवकानं या वादातून आईला मारहाण केली. याच संदर्भात तो कपील नगर पोलिसांत गेला. पण, तिथे त्याला ह्रदविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत गेल्याची घटना नागपुरात मंगळवारी रात्री घडली.

असं आहे प्रकरण

रवी पारधी (वय ३८) असं मृतकाचं नाव आहे. मंगळवारी रवीचे त्याच्या आईसोबत भांडण झाले. या भांडणात त्याने आपल्या आईला पाईपनं मारहाण केली. आई घरी रडत बसली होती. आपण आईला मारहाण केल्यानं ही माहिती पोलिसांना द्यावी, असं रवीला वाटलं. त्यामुळं तो मंगळवारी रात्री कपीलनगर पोलिसांत तक्रार करायला गेला.

 

पोलीस ठाण्यातच ह्रदयविकाचा झटका

पोलीस ठाण्यात असतानाच रवीच्या छातीत दुखायला लागले. त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पोलिसांनी रवीकडं पाहिले. दरम्यान, रवीला ह्रदयविकाराचा झटका आला. पोलिसांनी लगेच रवीला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी रवीला मृत घोषीत केले. या घटनेमुळं पोलीसह घाबरले. तक्रार करण्यासाठी आलेल्या युवकाचा मृत्यू ठाण्यात असताना झाला. त्यामुळं पोलिसांनी सीआयडीला पत्र लिहिलं. तुम्हाला चौकशी करायची असेल, तर तुम्ही करू शकता, असं या पत्रात म्हटलं आहे.

 

अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू

सदर पोलीस ठाण्यांतर्गत स्टारबस आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातातील दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. सहा डिसेंबर रोजी दुपारी पुरुषोत्तम मलवार (वय ३४, रा. झिंगाबाई टाकळी) हे आपल्या दुचाकी स्प्लेंडरने जात होते. दरम्यान, गोंडवाना चौक ते छावणी चौकदरम्यान, साई मंदिरजवळ रोडवर स्टार बसचा चालक नीलेश विष्णू बोंदरे (वय २८, रा. वलनी, खापरखेडा) याने दुचाकीला धडक दिली. या अपघातात पुरुषोत्तम हे गंभीर जखमी झाले. गंभीर अवस्थेत उपचाराकरिता अॅलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सात डिसेंबर रोजी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur Corona | धोका ओमिक्रॉनचा : विदेशातून येणाऱ्यांची कोरोना चाचणी अनिवार्य, पॉझिटिव्ह आल्यास होणार जीनोम सिक्वेन्सिंग

Nagpur | विदर्भातील 38 नगरपंचायतीच्या 105 जागांना फटका, ओबीसी आरक्षणाच्या जागांवर स्थगिती

अवकाळी पावसाचा केवळ तुरीला आधार, फळबागांसह इतर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव