नागपूर : युवक काँग्रेसच्या निवडणुकीत (Youth Congress Election) नागपुरातील तौसिफ खान यांची शहरअध्यक्ष (Tousif Khan City President) म्हणून निवड करण्यात आलीय. पण 39 वर्षांचे तौसिफ खान युवक काँग्रेसचे अध्यक्ष कसे? असा सवाल शहराध्यक्ष पदाची निवडणूक लढलेले वसीम खान आणि सहकारी अक्षय घाटोळे यांनी विचारला. युवक काँग्रेसच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केलाय. याबाबत दिल्ली दरबारी तक्रार करणार आहोत. वेळप्रसंगी आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिलाय. युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सर्वाधिक मत घेणारा अध्यक्ष आणि त्याच्यानंतर मत घेणाऱ्यांना उपाध्यक्ष, महासचिवचे पद मिळते. तौसिफसोबत वसीम खान, रौनक चौधरी, अक्षय घाटोळे यांना मिळालेली मते युवक काँग्रेसने होल्डवर ठेवली होती. रोक हटताच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके (National Secretary Bunty Shelke) यांच्या गटाने तौसिफ यांना पुन्हा अध्यक्ष निवडण्यात आल्याची घोषणा केलीय. त्यामुळे गटबाजी उफाळून आलीय.
वसीम खान, अक्षय घाटोळे यांच्या म्हणण्यानुसार, तौसिफ खानवर गुन्हे दाखल आहेत. शिवाय वय पस्तीस वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यामुळं तौसिफ खान युवक काँग्रेसची निवडणूक लढू शकत नाहीत. शीलजरत्न पांडे समर्थकांनी आक्षेप घेतला की, सर्वाधिक मते घेणारे तीन उमेदवार निवडणुकीसाठी पात्र नाहीत. युवक काँग्रेसने वसीम खान, रौनक चौधरी व अक्षय घाटोळे हे तीन महिन्यांपर्यंत आपला कार्यभार सांभाळू शकणार नाही.
उमेदवार मिळालेली – मते
तौसिफ खान – 25,935
वसीम खान – 12,८३836
अक्षय घाटोळे – 9,098
तेजस जिचकार – 5809
सुभम सांगोळे – 2,723