नागपूर : नागपुरात सध्या G20 च्या निमित्ताने सुशोभीकरण सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि दुभाजकावर झाडं लावली जात आहेत. मात्र, या दुभाजकावर लावलेली झाडंचं चक्क चोरली जात असल्याचा प्रकार घडलाय. नागपूरच्या वर्धा मार्गावरील, छत्रपती चौकाजवळ हा झाडं चोरीचा प्रकार घडलाय. एका कारमध्ये दोन तरुण रात्रीच्या वेळी या चौकाजवळ आले आणि दुभाजकावरील झाडं चोरून कारमध्ये टाकत धूम ठोकली. यावेळी एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कैद केला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
नागपूर शहरात सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी भिंतींवर रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळे लूट खूप चांगला दिसत आहे. दुभाजकांवर झाडं लावली जात आहेत. काही ठिकाणी जुनी झाडं लावली गेली आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या सौंदर्यात भर पडत आहे. पण, याला काही जणांची नजर लागत आहे. काही जण चोऱ्या करत आहेत. या चोऱ्या करणारे व्हिडिओत कैद झालेत. तोच चर्चेचा सध्या विषय आहे.
दोन तरुण आणि सुशिक्षित मुलं कारमधून उतरली. संध्याकाळची वेळ आहे. त्यामुळं अंधार पडलेला आहे. काही वाहनांचीसुद्धा ये-जा सुरू आहे. हे युवक थेट दुभाजकाकडं गेली. त्यांनी तिथून मनपाने लावलेली दोन झाडं उपटली. दोघांनी दोन हातात दोन झाडं आणली. ती कारच्या डिक्कीत भरली. त्यानंतर कार सुरू करून निघून गेले. तेवढ्यात कुणीतरी ही बाब कॅमेऱ्यात कैद केली.
कारने येणारे तरुण म्हणजे श्रीमंतांची मुलं जमजली जातात. पण, अशी मुलं सहसा झाडांची चोरी करणार, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. कारण या झाडांची किंमती शंभर ते दोनशे रुपये असेल. तेवढ्यासाठी ही मुलं चोरी कशी करतील, असा प्रश्न साहजीकच पडतो. पण, मग, हे तरुण म्हणजे कुणी गाडीचे चालक तर नाहीत ना, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने याचा तपास पोलीस करू शकतात. त्यानंतर हे तरुण कोण हे स्पष्ट होईल.