विनोद तावडेंवर कोट्यावधी रूपयांचं वाटप केल्याचा आरोप; नालासोपारामध्ये प्रचंड गोंधळ, त्या डायरीत नेमकं काय?

| Updated on: Nov 19, 2024 | 1:51 PM

Hitendra Thakur Allegation on Vinod Tawade : निवडणूक काळात विनोद तावडेंवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कोट्यावधी रूपयांचं वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नालासोपारामध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळतोय, बहुजन विकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले आहेत.

विनोद तावडेंवर कोट्यावधी रूपयांचं वाटप केल्याचा आरोप; नालासोपारामध्ये प्रचंड गोंधळ, त्या डायरीत नेमकं काय?
विनोद तावडे, नेते, भाजप
Image Credit source: Facebook
Follow us on

राज्यात विधानसभेची निवडणूक होतेय. काल प्रचार संपला आहे. उद्या मतदान होणार आहे. असं असतानाच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. विनोद तावडे यांच्यासह भाजपचे नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक यांना विवांता हॉटेलमध्ये घेरलं आहे. यावेळी भाजप आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही गटात तुफान राडा सुरु आहे. जोवर विनोद तावडे हॉटेलच्या खाली येऊन लोकांशी बोलणार नाहीत, तोवर इथून हटणार नाही, अशी भूमिका बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

‘त्या’ डायरीत नेमकं काय?

विनोद तावडे आणि त्यांचे कार्यकर्ते विरार पूर्व मनवेलपाडामधील विवांता हॉटेलमध्ये बसले होते. तेव्हा क्षितीज ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं. काळ्या रंगाच्या बॅगमधून डायरी बाहेर काढत क्षितीज ठाकूर यांनी जाब विचारला.

हितेंद्र ठाकूर यांचे आरोप काय?

विनोद तावडे यांनी मतदारांना वाटण्यासाठी 15 कोटी आणल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. जोवर कारवाई होत नाही, तोवर तावडेंना सोडणार नाही. माफ करा मला जाऊ द्या, अशी विनंती करणारे फोन विनोद तावडे करत आहेत. 25 फोन विनोद तावडे यांनी केले आहेत, असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.

भाजपचा राष्ट्रीय नेता पैसे वाटायला आलाय. पोलिसांनी कारवाई करावी, त्यानंतरच आम्ही तावडेंना सोडू. माझा फोन बघा. त्यांचे किती इनकमिंग कॉल आहेत. मला अगोदरच कळालं होतं विनोद तावडे पाच कोटी घेऊन पैसे वाटण्यासाठी येणार आहेत. डायऱ्या मिळाल्या आहेत. काय कायदेशीर कारवाई होते बघू. मी कायदे-नियम पाळणारा माणूस आहे. विनोद तावडे, राजन नाईक यांच्यावर नियमानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. नाहीतर उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यत ते माझ्यासोबत इथेच राहतील. मी त्यांना एकांतात भेटणार नाही. त्यांनी लोकांसमोर येऊन त्यांनी बोलावं, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत.