पुणेः राज्यातील राजकारणामध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या आणि पोटनिवडणुका लागल्या असल्याने प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. पुण्यातील कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत शरद पवार, अजित पवार, नाना पटोले आणि राज ठाकरे यांच्याबरोबर फोनवरून विनंती केली आहे. मात्र आता काँग्रेसने आपली भूमिका मांडत काँग्रेसकडून पोटनिवडणुकीची सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता 7 तारीख उमेदवारी अर्ज भरण्याची तारखी आम्ही उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहोत असंही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता का असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आपण बसून चर्चा करू असंही त्यांना सांगितले असल्याचे त्यांनी बोलले.
तर टिळक परिवारात उमेदवारी मिळाली नाही याबद्दल त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो काँग्रेसला प्रस्ताव दिला आहे त्याला अर्थ राहिला नाही असंही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रच्या राजकीय परंपरेची आणि संस्कृतीची जरी चर्चा केली असली तरी ती आता मला करायची नाही असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
एकनाथ शिंदे आणि भाजप ज्या महाराष्ट्राच्या ज्या परंपरेची चर्चा करतात, त्या विषयी मला चर्चा करायची नाही. कारण ज्या वेळी मुक्ता टिळक आजारी होत्या,
तरीही ज्यावेळी भाजपला ज्यावेळी त्यांची गरज होती तेव्हा मतदानासाठी स्ट्रेचरवर बसवून आणलं होते मात्र आता राजकीय परंपरा आणि संस्कृतीची चर्चा भाजप करत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे गटावर ज्या प्रमाणे टीका केली आहे. त्याच प्रमाणे त्यांनी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसकडून आता आंदोलन छेडण्यात येणार आहे.
त्याविषयी बोलताना नाना पटोले यांनी एलआयसीच्या ठेवीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. लोकांनी एलआयसीमध्ये केलेली गुंतवणूक असुरक्षित आहे अशी टीका त्यांनी केली आहे.
त्याबाबत भाजप कोणत्याही मुद्यावर चर्चा करायला तयार नाही असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. भाजप कोणत्याही मुद्यावर ठोस भूमिका घेत नाही म्हणून आता काँग्रेसच्यावतीने रस्त्यावरची लढाई लढण्याचा विचार करत आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीविषयी बोलतानाही त्यांनी या निवडणुकीबाबत अजून कोणत्याही प्रकारचं तिकीट फायनल नाही, मात्र आज रात्रीपर्यंत ते तिकीट कुणाला द्यायचं हे फायनल होईल असंही त्यांनी स्पष्ट केले.
तिकिटाच्या निर्णयाविषयीच आम्ही साडे नऊ वाजता कसबा गणपती समोर गोळा होणार असून त्याचवेळी नावाचीही घोषणा होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, कसबा, चिंचवड पोटनिडणुकीविषयी आपण नाना पटोले यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केली असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले होते.
तर त्यांच्या या फोनवर चर्चा करताना नाना पटोले म्हणाले की, मी भराडी मातेच्या मी भराडी मातेच्या दर्शनाला गेलो होतो, तेव्हा मला कॉल आला होता. तेव्हा मी त्यांना आता विचारणार आहे की टिळक कुटुंबीयांवर अन्याय का असा सवाल त्यांना विचारणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.