रत्नागिरी : ओबीसी समाजाच्या (OBC Reservation) प्रश्नावर काँग्रेस (Congress) आक्रमक झाली असून आज काँग्रेसने हल्लाबोल रॅली काढलीय.रत्नागिरीतून या आंदोलनाला सुरुवात झालीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Nana Patole) नाना पटोले, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, माजी खासदार हुसेन दलवाई या रॅलीत सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या इंपिरीअल डाटा न दिल्यामुळे सुप्रीम कोर्टाने ओबीसी समाजाचा राजकीय आणि सामाजिक आरक्षण कमी केलं. सातत्याने राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून केंद्र सरकारला डाटा देण्याची मागणी केली. या सगळ्या व्यवस्थेमध्ये केंद्र सरकारच्या या धोरणामुळे ओबीसी समाजाचा राजकीय सामाजिक आणि उद्याच्या काळात आरक्षणच कमी करायचे धोरण केंद्र सरकारने सुरू केलेला आहे. असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. गेल्या अनेक महिन्यापासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे. त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.ओबीसी आरक्षणावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोपांच्या फैरी सुरू आहेत.
ओबीसींच्या प्रश्नांवरून काँग्रेस आक्रमक
ओबीसी आरक्षण आणि तर मागण्यांसाटी जनजागरणाची सुरुवात काँग्रेसने रत्नागिरीतून केलीय. सरकारच्या खासगीकरण धोरणामुळे सगळ्यात मोठा आरक्षणाला धोका निर्माण झालेला आहे. केंद्र सरकारने सगळे सार्वजनिक उपक्रम विकायला सुरुवात केलीय.कोकण रेल्वेदेखील विकायला काढलीय. जर सार्वजनिक उपक्रम खाजगी झाले तर आरक्षण या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा घाट नरेंद्र मोदींच्या सरकारने सुरू केला आहे. त्यांच्या विरोधात जनजागरण मेळाव्याची सुरुवात रत्नागिरीतून काँग्रेसने केलीय. अशी माहिती यावेळी काँग्रेसने दिली आहे. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दाही तापला आहे. अलिकडेच मराठा आरक्षणासाछी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषणाची हाक दिल्याने सरकारची चिंता वाढली आहे.
त्रास द्याल तर आमचेही दिवस येतील
मोदींवर टीका करताना, भाजपच्या भाषणातून काँग्रेसचे नाव गेले तर यांना कोणी विचारणार नाही. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल केला जातोय. मोदी सरकारने 8 वर्षाच्या कामाचा हिशोब द्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीये. नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा मोठा भूकंप कुठला असूच शकत नाही, असा हल्लाबोल देखील नाना पटोले यांनी मोदींवर केला आहे. आपला देश चीन च्या ताब्यात चाललाय. सुनेचे दिवस येतील.सासू सारखा त्रास दिला तर त्रास होणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे. संजय राउत यांनी काढलेल्या घोटाळ्यांची चौकशी झालीच पाहिजे. महाराष्ट्रात 2024 मध्ये नक्कीच परिवर्तन होईल आणि मावळ्यांचे सरकार येईल असा विश्वास काँग्रस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलाय.
आदित्य ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजप आमदार रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल
संजय राऊतांची पत्रकार परिषद नव्हे तर घाम पुसत केलेले भाषण, नितेश राणेंचा पुन्हा घणाघात