Video : पावसाचा हाहा:कार, घरात पाणी शिरलं, जनावरं वाहून गेली; नांदेडमधील गावांना पुराचा वेढा

| Updated on: Sep 02, 2024 | 1:41 PM

Marathwada Nanded Flood : दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील अनेकस भागात पूर आला आहे. हिंगोलीतील काही गावांना पुराने वेढा घातला आहे. अशातच आता नांदेडमधीलही व्हीडिओ समोर आलेत. अख्खं गाव पाण्याखाली गेल्याने लोक अडकून पडले आहेत. वाचा सविस्तर बातमी..

Video : पावसाचा हाहा:कार, घरात पाणी शिरलं, जनावरं वाहून गेली; नांदेडमधील गावांना पुराचा वेढा
नांदेडमध्ये गावांमध्ये पाणी शिरलं
Image Credit source: tv9
Follow us on

दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या मराठवाड्याचा काही भाग कालपासून पाण्याखाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पाण्यामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. नांदेड जिल्ह्यातील
हदगावमधील उंचडा गावाला कयाधू नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. शेतकऱ्यांची अनेक जनावरं सुद्धा वाहून गेली आहेत. सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. 30 शेतकरी शेतामध्ये, घरावर अडकून पडले आहेत. एसडीआरएफची टीम बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे.

नांदेडमध्ये मुसळधार पाऊस

नांदेडमध्ये पाण्याचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. नांदेड शहरातील मुख्य स्मशान भूमी पाण्याखाली गेली आहे. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील आसना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नांदेड शहराशी वसमत आणि इतर 50 ते 60 गावांचा संपर्क तुटला आहे. तर आताही नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा जोर कायम आहे.

पावसाचा जोर वाढला

कालपासून नांदेडमध्ये धो – धो पाऊस कोसळतोय. आता आज तासभराच्या विश्रांतीनंतर नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. नांदेड शहरातील अनेक सखल भागात पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. श्रावस्ती नगर, विष्णू नगर, गोकुळ नगर, हमालपुरा या भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. पावसाचा जोर वाढल्याने नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होण्याचा धोका आहे. नांदेड जिल्ह्यतील लिंबोटी धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. मनार नदीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. मनार नदीने धोक्यची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे मनार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यात पूर

मराठवाड्यात मुसळधार पाऊस होतोत. त्यामुळे नदी नाले तुटुंब भरून वाहत आहेत. हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील देवजना गावात काही शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले आहेत. काल रात्रीपासून देवजना गाव पाण्याखाली आहे. 40 शेतकरी पुराच्या पाण्यात अडकून पडलेत. तर धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली. अनेर धरणातून 15 हजार 800 क्युसेसने नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील केळणा नदीला पूर आला आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दहेगाव बंगला या गावात घुसलं आहे.