Nanded| अर्धापूर, नायगाव, माहूर नगरपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष 14 फेब्रुवारी रोजी ठरणार, काय आहे पुढील प्रक्रिया?

| Updated on: Feb 07, 2022 | 6:10 PM

नांदेडमधील नायगावात काँग्रेस तर अर्धापूरमध्ये महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे. माहूरमध्ये राष्ट्रवादीची सरशी झाली असून आता या ठिकाणी नगराध्यक्ष पदी कुणाची वर्णी लागते याची उत्सुकता लागली आहे.

Nanded| अर्धापूर, नायगाव, माहूर नगरपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष 14 फेब्रुवारी रोजी ठरणार, काय आहे पुढील प्रक्रिया?
Election
Follow us on

नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर (Ardhapur Nagar Panchayt), नायगाव, माहूर या तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या तीनही नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी (Nanded Collector) तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केला आहे. 14 फेब्रुवारी रोजी या पदांची निवड केली जाईल. या नगरपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना संबंधित पदांसाठी अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर अर्जांची छानणी झाल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण होईल, हे ठरेल. अर्धापूर आणि नायगावमध्ये काँग्रेसचे संख्याबळ (Congress won in Naigaon) अधिक असल्याने या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होईल. तसेच माहूरमध्ये राष्ट्रवादीकडे सर्वाधिक जागा असल्याने शिवसेना किंवा काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापनेसाठी तयारी सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नगराध्यक्षपद निवडीची प्रक्रिया कशी?

– नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरले जाईल.
– दुपारी 2 नंतर अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडेल. ट
– 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत दिली जाईल.
– 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत विशेष सभेत नगराध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्यात येईल.

उपनगराध्यक्ष पद निवडीची प्रक्रिया कशी?

– उपनगराध्यक्ष पदासाठी 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत उमेदवारी दाखल केली जाणार आहे.
– दुपारी 3 ते 3.30 वाजता अर्जांची छाननी होईल.
– 3.30 ते 3.45 वाजेपर्यंत उमेदवारी माघार घेण्यासाठी मुदत मिळेल.
– 3.45 नंतर उपनगराध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

तीन नगर पंचायतींचे निकाल काय?

नायगाव- या ठिकाणी काँग्रेसने विरोधकांना लोळण घ्यायला लावली. इथे काँग्रेसने 17 पैकी 17 जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत भाजप आमदार राजेश पवार यांना मोठा धक्का बसलसा. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.
माहूर- याठिकाणी काँग्रेसने 6, शिवसेनेने 3, राष्ट्रवादी काँग्रेसने 7, भाजपने 1 आणि शिवसेनेने 3 अशा जागा पटकावल्या आहेत. येथे पक्षीय बलाबल ठेवत महाविकास आघाडीने सत्ता हातात घेतली आहे.
अर्धापूर- अर्धापूरमध्ये काँग्रेसकडे 10, राष्ट्रवादीकडे 1, भाजपला 2, MIM ला 3 तर अपक्षांकडे एक जागा गेली आहे. येथे MIM ने प्रथमच खाते उघडले आहे.

इतर बातम्या-

Special Report | Nitesh Rane यांच्या जामिनावर उद्या सुनावणी…जामीन की कोठडीच ? tv9

दहावी, बारावीच्या परीक्षा सरावासाठी प्रश्नपेढी; विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांचे आवाहन