नांदेड: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (Nanded Police) अटक केली आहे. या पाच आरोपींकडून चार पिस्टल, दोन जिवंत काडतुस, एक एअरगण , चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरातील श्रावस्तीनगर (Shravastinagar) भागातील नाल्याच्या झुडपात हे आरोपी लपून बसले होते. त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले. ही टोळी रात्रीच्या अंधारात रस्त्यावर लोकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून लूट करत होती. यावेळी दरोडा (Robbery) टाकण्यापूर्वीच ही टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकलीय.
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीतील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास करण्यात येत आहे. दरोडा टाकणाऱ्या या टोळीकडून चार पिस्टल, दोन जिवंत काडतूस असा ऐवज जप्त केला गेला असून त्यांच्या या टोळीत आणखी कोणा कोणाचा समावेश आहे त्याचा तपासही नांदेड पोलिसांकडून चालू आहे.
गेल्या काही दिवसांपासून नांदेड परिसरात छोट्या मोठ्आ गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आताही ज्या दरोडेखोरांना अटक केली गेली आहे, त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांचा तपास उलगड्याची शक्यता पोलिसांनी वर्तवण्यात आली आहे. या पाच आरोपींकडून चार पिस्टल, दोन जिवंत काडतुस, एक एअरगण , चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला गेला असल्याने या शस्त्रस्त्रांचाही तपास केला जाणार आहे.
एअरगण, जिवंत काडतूस त्यांच्याकडे सापडली असल्याने त्याचा धाक दाखवून आणि कोणा कोणाला त्यांनी लुटले आहे का याचाही तपास केला जाणार असल्याचे नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले.
संबंधित बातम्या
आंध्र प्रदेशात माणूसकीला काळीमा; अल्पवयीन मुलीवर 80 नराधमांचा तब्बल 8 महिने अत्याचार
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा! अजून कुठे कुठे गुन्हे दाखल?