नांदेड : सात महिन्यांची गरोदर महिला सोनोग्राफी (Sonography) करण्यासाठी गेली असता तिचे निदान चुकीच्या पद्धतीने केल्याने मोठी दुर्दैवी घटना घडली. धर्माबादमधील या गर्भवती महिलेचा (Pregnant woman) मृत्यू झाला. तालुक्यातील बोळसा गावातील अनुसया चव्हाण असं या महिलेचं नाव असून तिची तेलंगणा राज्यातील म्हैसा येथे सोनोप्राफी करण्यात आली होती. गर्भवती महिला आणि तिच्या पोटातील बाळाचा 5 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणी संशय आल्यामुळे नांदेड पोलिसांनी (Nanded police) शासकीय रुग्णालयात सदर मृत्यूची चौकशी केली. या चौकशीतून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शासकीय रुग्णालयाने सोनोग्राफीचे चुकीचे निदान केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. त्यानंतर धर्माबाद पोलीसांनी तेलंगणा राज्यातील डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुसया गजानन चव्हाण ही गर्भवती असताना सातव्या आठवड्यातील सोनोप्राफी करण्यासाठी 7 जुलै 2021 रोजी तेलंगणा राज्यातील म्हैसा येथील डॉ. हाडीया बेगम यांच्या आराधना डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेली होतकी. या ठिकाणी त्यांची सोनोग्राफी तपासणी करण्यात आली. परंतु डॉ. हाडीया बेगम यांनी चुकीचे निदान केले. त्यानंतर ही महिला घगरी परत आली. पोटातील बाळ सुरक्षित असल्याचा त्यांचा समज झाला. परंतु 5 जानेवारी रोजी गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात पोटात दुखत असल्याने महिलेला उमरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणाहून तिला नांदेडच्या रुग्णालयात हलवण्यात आले. विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात या महिलेचा बाळासह मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबियांनी आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरून चौकशी समिती बसवण्यात आली होती.
दरम्यान, गर्भवती महिनेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी काही तज्ज्ञ डॉक्टरांना उपचार आणि तपासणीचे सर्व अहवाल दाखवले. त्यात तेलंगणातील डॉक्टरांनी दिलेल्या सोनोग्राफी सेंटरच्या अहवालावर शंका घेण्यात आली होती. त्यानंतर नातेवाईकांनी याविरोधात तक्रार केली. तक्रारीच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. या समितीने डॉ. हाडीया बेगम यांची चुकीच्या पद्धतीने निदान केल्याचा ठपका ठेवला. त्यानंतर पोलिसांन या अहवालावनरून गुन्हा नोंदवला आहे.
इतर बातम्या-