गाडी सुटली, रुमाल हलले, प्रवासी तर मागेच राहिले, Nanded सचखंड Express वर शीख भाविकांचा हल्लाबोल, काय घडलं?

| Updated on: Mar 22, 2022 | 1:09 PM

ऐनवेळी रद्द करण्यात आलेला रेल्वेचा डबा लावून देण्यासाठी शिख धर्मियांनी आंदोलन केलं. सचखंड एक्सप्रेस सुटण्याच्या वेळीच त्यांनी रुळांवर ठिय्या मांडला. आधी डब्बा जोडून द्या, असा आग्रह सुरु केला. अखेर शिख भाविकांच्या आंदोलनापुढे रेल्वे प्रशासन नमले आणि तासाभरानंतर सचखंड एक्सप्रेस रवाना झाली.

गाडी सुटली, रुमाल हलले, प्रवासी तर मागेच राहिले, Nanded सचखंड Express वर शीख भाविकांचा हल्लाबोल, काय घडलं?
सचखंड एक्सप्रेससमोर प्रवाशांचा ठिय्या
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नांदेडः नांदेडहून दिल्लीमार्गे अमृतसरला जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेसमध्ये (Sachkhand Express) एक विचित्र प्रकार घडला. होळीसाठी नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर शीख भाविक आले आहेत. यापैकी काहीजण नांदेडहून अमृतसरला (Nanded Amritsar) जाण्यासाठी 22 मार्च रोजी सकाळी रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. सचखंड एक्सप्रेसची वेळ सकाळी 9 वाजता होती. गाडी रेल्वे स्टेशनला y दाखल झाली. प्रवासी चढले. मात्र काही प्रवाशांना त्यांचा आरक्षित केलेला कोचच (Railway Coach) सापडत नव्हता. रेल्वेच्या इंजिनपासून मागील डब्यापर्यंत प्रवाशांच्या येरझाऱ्या सुरु झाल्या. पण S-9 हा कोच प्रवाशांना सापडलाच नाही. गाडी निघण्याचीही वेळ झाली. काही वेळाने गाडी सुटली, पण संतप्त झालेल्या शीख भाविकांनी रेल्वे रुळावर बसूनच ठिय्या धरला. सचखंड एक्सप्रेसला आमचा डबा जोडून द्या, नाहीतर आम्ही येथून हलणार नाहीत, असा पवित्रा त्यांनी घेतला. अखेर रेल्वे प्रशासनाला प्रवाशांसमोर नमतं घ्यावं लागलं.

का घडलं असं?

झालं असं की, सचखंड एक्सप्रेसमधील S-9 हा कोच ऐनवेळी काल रात्री म्हणजेच 21 मार्च रोजी रद्द करण्यात आला. मात्र प्रवाशांनी 2 महिने आधीपासूनच या गाडीसाठी आरक्षण केलेले होते. हा कोच रद्द झाल्याचे मेसेज प्रवाशांना काल रात्री पाठवण्यात आले होते. मात्र ऐनवेळी आलेल्या या मॅसेजची प्रवाशांना कल्पनाही नव्हती. 22 मार्च रोजी सकाळी आपल्या गावी जाण्यासाठी हे सर्व प्रवासी नांदेड रेल्वे स्टेशनवर आले होते. काही भाविकांनी काल रात्रीचे मेसेज दाखवून स्टेशन मास्टर यांच्याशी संपर्कही साधला. मात्र त्यांना फार सकारात्मक उत्तर मिळाले नव्हते. अखेर सकाळी रेल्वे निघाल्यावर प्रवाशांनी मात्र रुळांवर हल्लाबोल केला.

रुळांवर शिख भाविकांचा ठिय्या

ऐनवेळी रद्द करण्यात आलेला रेल्वेचा डबा लावून देण्यासाठी शिख धर्मियांनी आंदोलन केलं. सचखंड एक्सप्रेस सुटण्याच्या वेळीच त्यांनी रुळांवर ठिय्या मांडला. आधी डब्बा जोडून द्या, असा आग्रह सुरु केला. अखेर शिख भाविकांच्या आंदोलनापुढे रेल्वे प्रशासन नमले आणि तासाभरानंतर सचखंड एक्सप्रेस रवाना झाली. नांदेडहून दिल्लीमार्गे अमृतसरला जाणारी सचखंड एक्सप्रेस ही मराठवाड्यातील प्रवाशांना उत्तर भारताशी जोडणारी महत्त्वाची रेल्वे आहे. मात्र एवढा लांबचा पल्ला असल्याने अनेकदा या रेल्वेच्या वेळेत मोठा विलंब होतो. पण वेळेवर आली तर या रेल्वेपेक्षा इतर कोणतीही रेल्वे सोयीची नाही, असाच अनुभव मराठवाड्यातील प्रवाशांचा आहे.

इतर बातम्या-

ठाकरे सरकारचा गृहनिर्माण संस्थासाठी मोठा निर्णय, शासकीय निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्तीमधून सूट

ठरलं! नाशिक साखर कारखान्याचे बॉयलर 10 वर्षांनी पेटणार; 5500 जणांना रोजगाराची संधी!