उच्च शिक्षित तरुणीला ‘शेतकरी नवरा हवा’, वडिलांनी इच्छा पूर्ण केली, पंधरा एकर शेती…

| Updated on: Jul 09, 2023 | 9:13 AM

गावकडच्या मुलींना शेतकरी मुलगा नवरा म्हणून नको असतो, त्यामुळं अनेक शेतकरी मुलांची लग्न अद्याप झालेली नाहीत. पण एका उच्च शिक्षित मुलीले शेतकरी मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिची नांदेड जिल्ह्यात सगळीकडं चर्चा आहे.

उच्च शिक्षित तरुणीला शेतकरी नवरा हवा, वडिलांनी इच्छा पूर्ण केली, पंधरा एकर शेती...
nanded viral story
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नांदेड : देशात शेतकऱ्यांची (Maharashtra farmer) अवस्था काय आहे, हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे शेतकरी नवरा नको बाई अशी स्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळते. काही शेतकरी मुलांची लग्नं त्यामुळं झालेली नाहीत अशी स्थिती पाहायला मिळत आहे. सध्या नांदेडमध्ये (nanded) आज होणाऱ्या लग्नाची चर्चा सगळीकडं आहे. एका उच्च शिक्षित मुलीने शेतकरी मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिच्या वडिलांची मोठी अडचण झाली होती. विशेष म्हणजे तिच्या वडिलांनी त्या मुलीची इच्छा पूर्ण केली आहे. वैष्णवी कदम (vaishnavi kadam) असं त्या तरुणीचं नाव आहे. वैष्णवीने तीन शाखांमधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे.

शेतकरी ‘नवरा नको ग बाई’असं म्हणत अनेक तरुणी शेतकऱ्यांची स्थळ फेटाळत असतात. पण एका उच्च शिक्षित तरुणीने मात्र शेतकरी नवराच हवा असा हट्ट केला. त्यामळे मोठ्या शहरातून आलेली चांगली स्थळ नाकारून तिच्या वडिलांनी मुलीची इच्छा पूर्ण केली आहे. आज त्या मुलींचं पारंपारिक पद्धतीने लग्न होणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील साप्ती हे वैष्णवी कदम यांचं आहे. आई वडिलांना एककुती लेक असणारी वैष्णवीला वडीलांनी लाडात वाढवून इच्छेप्रमाणे शिक्षण दिले. त्याचबरोबर वैष्णवी हुशार असल्यामुळे तीने तीन शाखेत पदवी देखील घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

पदवी घेतल्यानंतर वैष्णवीने एका खासगी बँकेत नोकरी सुरु केली आहे. त्यानंतर वैष्णवीला शहरातून लग्नासाठी मोठी स्थळ यायला सुरुवात झाली. पण वैष्णवीला शेतकरी मुलाशी लग्न करायचं असल्यामुळे घरच्यांची मोठी अडचण झाली होती. परंतु वडीलांनी तिच्या मनासारखं स्थळ शोधून काढलं आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील नितीन पाटील या शेतकरी युवकाशी वैष्णवीचं तिच्या कुटुंबियांनी लग्न ठरवलं आहे. नितीन पाटील असं त्या तरुणाचं नाव आहे. त्या तरुणाकडे पंधरा एकर शेती आहे. विशेष म्हणजे आज दुपारी हा विवाह सोहळा पार पडणार आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती वैष्णवीच्या या धाडसी निर्णयाचं सगळे कौतुक करीत आहेत.