मोठी बातमी! नंदीग्राम एक्स्प्रेसला आग, प्रवाशांची धावपळ

| Updated on: Nov 09, 2024 | 8:26 PM

मोठी बातमी समोर येत आहे. नंदीग्राम एक्स्प्रेसच्या कोचला आग लागल्याची घटना घडली आहे. कसारा परिसरात नंदीग्राम एक्स्प्रेसच्या कोचला आग लागली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! नंदीग्राम एक्स्प्रेसला आग, प्रवाशांची धावपळ
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मोठी बातमी समोर येत आहे. नंदीग्राम एक्स्प्रेसच्या कोचला आग लागल्याची घटना घडली आहे. कसारा परिसरात नंदीग्राम एक्स्प्रेसच्या कोचला आग लागली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. आगीची घटना लक्षात आल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच धावपळ उडाली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. आग लागल्याचं लक्षात येताच नंदीग्राम एक्स्प्रेस कसारा सिग्नल जवळ थांबवण्यात आली. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत माहिती मिळू शकलेली नाहीये.आग अद्याप अटोक्यावर आलेली नाहीये आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार नंदीग्राम एक्स्प्रेसच्या कॉम्प्रेसरला आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याचं लक्षात येताच ट्रेन कसारा सिग्नल जवळ थांबवण्यात आली. आगीच्या घटनेमुळे प्रवाशांची एकच धावपळ उडाली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र एक्स्प्रेसचं नुकसानं झालं आहे. आग लागल्याचं लक्षात येताच याबाबत तातडीनं अग्निशमन दलाला कळवण्यात आलं, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ट्रेनमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं असून, त्यांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आलं आहे.

आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होवू शकलेलं नाहीये, आगीची घटना लक्षात आल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच धावपळ उडाली, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या रेल्वेमधून उतरवण्यात आलं असून, त्यांना इतर ठिकाणी हलवण्यात आलं आहे.