गौतम बैसाने, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नंदुरबार | 06 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडी घडत आहेत. अशात महाविकास आघाडीच्या जागावाटपावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज महाविकास आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्मुला ठरणार आहे. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. 48 जागा महाविकास आघाडी लढणार आहे. आमच्यात कुठेही वाद नाही, असं नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप आमच्यावर परिवारवादाचा आरोप करतं. पण मग अमित शाह यांच्या मुलाला क्रिकेट खेळता येतं का? ते क्रिकेट बोर्डावर कसे आले मग? सत्तेच्या जोरावर आपल्या परिवारातील लोक कसे पदावर जातात. भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकणारा त्याचा दावा करत आहे. मात्र भाजप आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का घेतल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्यास तर भाजपाला भाजपची ताकद कळाली असती, असं नाना पटोले म्हणालेत.
भाजप जुमले करत आहे. घोषणा करत नाही. निवडणुका झाल्यावर ती भाजप सांगतं की हे आमचे जुमले होते. घोषणा गरिबांसाठी नव्हत्या… उद्योगपतींसाठी होत्या. अस निवडणूक झाल्यावरती भाजप पक्ष सांगतो. उद्योगपतींना न्याय द्यायचं होतं. यासाठी घोषणा केल्या होत्या आणि लाखो रुपयांचे कर्ज उद्योगपतींच्या माफ भाजप करत आहे, असा घणाघात पटोलेंनी केला आहे.
भाजप नेहमी परिवार वादावर बोलत आहेत. मात्र जो प्रश्न उपस्थित करता त्यांनी आपल्या परिवाराकडे पाहायला पाहिजे. परंतु अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या घरातील लोकांना उमेदवार दिले जात आहेत. त्यामुळे हा परिवार वाद नाही आहे का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.
गेल्या दहा वर्षापासून भाजप सत्तेत आहे. त्यांनी काय केलं? भाजपने दहा वर्षात देशील मोठमोठ्या संस्था विकण्याचं काम केलं. भाजप महाराष्ट्रातून अनेक उद्योग गुजरातला घेऊन जात आहे. गुजरातला आमच्या विरोध नाही आहे. पण गुजरातलाच का उद्योग नेले जात आहे. गुजरातला बदनाम करण्याचं काम भाजप करत आहे. गुजरात आमच्यासाठी आदरणीय आहे. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, त्यामुळे गुजरातचं आमच्यावर मोठं ऋण आहे कर्ज आहे. पण महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला नेता कामा नये, असं पटोले म्हणाले.