जितेंद्र बैसाणे, नंदूरबार : आयुष्यातला संघर्ष कुणालाचं चुकला नाही, असं आपण अनेकदा बोलत असतो. प्रत्येकाला आयुष्यात संघर्ष करावा लागतो. नंदुरबार (nandurbar latest news) सारख्या आदिवासी दुर्गम जिल्ह्यातील शहादा (shahada) येथील पल्लवी बेलदार (pallavi beldar) या तरुणीची स्टोरी सुध्दा तशीचं आहे. पल्लवी बेलदार या तरुणीला जिल्ह्यात पहिली महिला बस चालक होण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळं सगळीकडं त्यांची चर्चा सुरु आहे. भावाचा मृत्यू झाल्यानंतर, वडिलांचं छत्र हरपलं. त्यानंतर सगळी जबाबदारी पल्लवी बेलदार हीच्या खांद्यावर आली. आईला संभाळत असताना एसटी महामंडळात चालकाचं प्रशिक्षण घेतलं. आयुष्यात केलेला संघर्ष सांगत असताना पल्लवी बेलदार या तरुणीच्या डोळ्यात पाणी आलं. शहादा आगारातील बसच्या त्यांनी काल अधिक फेऱ्या मारल्या आहेत.
घरातील कर्त्या माणसाचा आधार गेल्यानंतर दुःख करत न बसता परिस्थितीशी दोन हात करत नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम जिल्ह्यातील शहादा येथील पल्लवी बेलदार या तरुणीने जिल्ह्यात पहिली महिला बस चालक होण्याचा मान मिळवला आहे. पल्लवी यांचा हा प्रवास संघर्षमय राहिला असून त्यांनी जिल्ह्यातील शहादाआगारातील बस फेऱ्या मारून आपल्या कामाचा श्रीगणेशा केला आहे. नंदुरबार जिल्ह्यात पहिली महिला एसटी चालवत असल्याचं पाहून अनेकांना आच्छर्य वाटलं. अनेकांनी पल्लवीला शुभेच्छा दिल्या आहेत.
पल्लवी बेलदार शहादा बस आगारात महिला चालक म्हणून रुजू झाल्या आहेत. पल्लवीची प्रवास अत्यंत संघर्षमय आहे. कोरोना काळात वडिलांचा आधार गेला, त्याच्या अगोदर २०१७ मध्ये भावाचा मृत्यू झाला. मोठ्या बहिणीचे लग्न झाल्याने घराची जबाबदारी पल्लवीवर आली होती. विशेष म्हणजे ज्यावेळी पल्लवी या एसटी महामंडळाच्या चालकाचं प्रशिक्षण घेत होत्या, त्याचवेळी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. जबाबदारीचं भान राखत आईचा सांभाळ करीत पल्लवी यांनी न डगमगता औरंगाबाद येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शहादा आगारात बस चालक म्हणून त्यांनी जिल्ह्यात पहिली महिला एसटी ड्रायव्हर होण्याचा सन्मान पल्लवी बेलदारच्या नावावर झाला आहे.