Sanjay Raut : मोदी हा ब्रँड होता, ब्रँडी झाला; संजय राऊत यांचा घणाघाती हल्ला

| Updated on: Jun 19, 2024 | 8:41 PM

400 पार करणार होते. त्याचे 200 केले म्हणून आभार मानता? बहुतेक त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मोदी हा ब्रँड होता पण आता त्याची ब्रँडी झाली आहे. देशी ब्रँडी झाली आहे. या नशेत ते असे काही करत आहे. तुम्हाला नाकारलंय, लाथाडलंय आणि आभार मानताय?

Sanjay Raut : मोदी हा ब्रँड होता, ब्रँडी झाला; संजय राऊत यांचा घणाघाती हल्ला
संजय राऊत
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

गुजरातचे सोमे गोमे हवशे, नवशे, गवशे आले होते. शिवसेनेवर वार करून शिवसेना संपवता आली हे स्वप्न कुणी पाहू नये. शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. छत्रपतींनी आपली मान दिल्लीच्या तख्तासमोर झुकवली नाही. त्याच महाराष्ट्राचा वारसा बाळासाहेबांनी चालवला. भाजप आता आभार यात्रा काढणार आहे. कशासाठी महाराष्ट्राने पराभव केल्याबद्दल. मोदींना बहुमत मुक्त केल्यामुळे? 400 पार करणार होते. त्याचे 200 केले म्हणून आभार मानता? बहुतेक त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मोदी हा ब्रँड होता पण आता त्याची ब्रँडी झाली आहे. देशी ब्रँडी झाली आहे. या नशेत ते असे काही करत आहे. तुम्हाला नाकारलंय, लाथाडलंय आणि आभार मानताय? अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा 58 वा वर्धापन दिन सोहळा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला होता. त्यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना संजय राऊत बोलत होते. भाजपवाले आता ब्रँडीचे दोन दोन घोट मारत आहेत. नशेमध्ये काय करत आहेत ते त्यांचे त्यांनाच माहित नाही. उत्तर प्रदेशमध्ये प्राण प्रतिष्टा केली. राम मंदिर बांधले. अयोध्येत रामाचे फोटो लहान आणि मोदी यांचे फोटो मोठे होते. रामाचा फोटो एवढा मला वाटायचं की मोठा कोण? म्हणून रामाने त्यांना तारले नाही. अयोध्येत हरले, रामेश्वरम मध्ये हरले. रामटेकमध्ये हरले अशी टीकाही त्यांनी केली.

मोदी यांचा खुळखुळा कुणी केला असेल तर तो उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना संपवायला निघाले पण शिवसेना आहे कुठे? शिवसेना संपणार नाही. हलाहला प्राशन करून शिवसेना उभी आहे. मोदी यांचा रामानेच पराभव केला. कारण त्यांचे हिंदुत्व नकली आणि ढोंगी हिंदुत्व आहे. त्यांना सत्ता लागला. पण त्याचा हा शेवटचा आकडा आहे. तो पुन्हा लागणार नाही. त्यांना सात जागा मिळाल्या. अमोल किर्तीकर यांचा विजय चोरला. तसेच अनेक विजय चोरले. बेईमानी आणि गद्दारीचा स्ट्राईक खाली आणू. देशातली आणि महाराष्ट्रातली सत्ताही आम्ही खाली आणु असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला.