सातारा : मराठा आरक्षणासह कष्टकऱ्यांचा लढ्यासाठी सतत झगडणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ते मराठा आरक्षणासह, कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार आहेत. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या फाऊंडेशनचे गुरुवारी (21 जानेवारी) उद्धाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटन समारंभाला खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. (Narendra Patil formed Annasaheb Patil vikas foundation)
अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून कष्टकरी, सामान्यांच्या अडचणी, माथाडी कामगार यांच्या अडचणींवर काम केले जाणार आहे. तसचे या फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रामुख्याने कुठल्याही राजकारणाचा हस्तक्षेप न होऊ देता मराठा आरक्षणाचा लढासुद्दा या प्रखरपणे लढला जाणार आहे, अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली. उदयनराजे, संभाजीराजे आणि शिवेंद्रसिंहराजे असे तिन्ही राजे फाऊंडेशन उद्धाटनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. त्यांनतर नरेंद्र पाटलांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. “अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे संचालक मंडळ सरकारने बरखास्त केले त्याबद्दल मला वाईट वाटले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो,” असे नरेंद्र पाटील म्हणाले होते.
बहुजन कल्याण विकासमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याचा मराठा भूषण पुरस्कार देऊन जाहीर सत्कार केला जाईल, अशी घोषणा सकल मराठा समाज या संघटनेने केली आहे.या घोषणेची अधिकृत माहिती सचिन तोडकर यांनी आज (26 जानेवारी) दिली दिली. तसेच, समस्त मराठा समाजाने वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळं फासण्याचे आवाहनही त्यांनी केले. सकल मराठा समाजाच्या या घोषणेनंतर वडेट्टीवार यांना अद्याप अधिकृत प्रतक्रिया दिलेली नाही.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये आंदोलन केले. यावेळी त्यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सचिन तोडकर यांनी मंत्री वडेट्टीवार यांच्या चेहऱ्याला जो कोणी काळ फासेल त्या व्यक्तीचा कोल्हापुरातील मराठा समाज, मराठा भूषण पुरस्कार देऊन जाहीर सत्कार करेल असं सांगितल.
Bigg Boss 14 | राखी सावंत आणि रुबीना दिलैकमध्ये वाद!https://t.co/ORUdjqrgLA #BiggBoss | #BiggBoss14 | #SalmanKhan | #RubinaDialik | #RakhiiSawant | #AbhinavSukla | @BiggBoss @BeingSalmanKhan @RubiDilaik @rahulvaidya23
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
संबंधित बातम्या :
(Narendra patil formed annasaheb patil vikas foundation)