नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात आधार कार्ड (Aadhar card) केंद्र शोधून थकलेल्या, तिथे पहाटेपासून लागलेल्या लांबलचक रांगा पाहून कंटाळलेल्या बापलोकांसाठी एक टेन्शन खल्लास करणारी बातमी. चिंता करू नका. होय, आता तुमच्या लहान मुलाचे आधारकार्ड चक्क तुमच्या गल्लीत असणाऱ्या अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल. त्यासाठी फक्त इतकेच करावे लागेल. तुमच्या जवळपासची अंगणवाडी शोधण्याचे सगळ्यात महत्त्वाचे काम. आणि हे केंद्र कोणाची एजन्सी वगैरे नसेल बरे का. तर केंद्र सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाकडून हे आधार कार्ड काढून देण्यात येईल. कारण अंगणवाडीत जाणाऱ्या मुलांना पोषण आहार आणि आरोग्याच्या योजनांची माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे आधारकार्ड काढले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडीत एक आधाराकार्ड केंद्रही सुरू करण्यात येणार आहे.
नाशिकसाठी 78 यंत्रे
नाशिक जिल्ह्यासाठी आधारकार्ड काढायला 78 यंत्र मिळणार आहेत. जिल्ह्यातील 15 तालुक्यात 26 बाल विकास प्रकल्प कार्यालय आहेत. यातील प्रत्येक प्रकल्पाला तीन यंत्रे देण्यात येणार आहेत. सध्या अंगणवाडीतील मुलांची माहिती अंगणवाडी सेविका ऑनलाईन सादर करतात. मात्र, या नव्या निर्णयामुळे ही माहिती आता आधारकार्डसोबत जोडली जाणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचा ताणही हलका होण्यास मदत मिळणार आहे.
आधार कार्ड असे करा अपडेट
आपण आपले नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि आधार कार्डमध्ये भाषा ऑनलाईन मोडद्वारे अपडेट करू शकता. अन्य अपडेटसाठी तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्र किंवा नावनोंदणी / अपडेट केंद्राला भेट द्यावी लागेल. आधार कार्डमध्ये तुम्हाला नावात दोन वेळा, जन्मतारखेत एकदा, लिंगाची माहिती एकदा अपडेट करता येते. आधार कार्डमधील जन्मतारीख ऑनलाईनच्या माध्यमातून कशाप्रकारे अपडेट केली जाऊ शकते, याची माहिती भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीने (UIDAI) ने ट्वीट करत दिली आहे. यूआयडीएआयने केलेल्या ट्वीटनुसार, ‘आता तुम्ही https://ssup.uidai.gov.in/ssup/ या लिंकवर क्लिक करुन आधार कार्डमध्ये जन्मतारीख अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला स्कॅन केलेली मूळ कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
कोणती कागदपत्र आवश्यक?
आधार कार्डमध्ये जन्मतारीख अपडेट करण्यासाठी आधारने दिलेल्या कागदपत्रांच्या यादीनुसार, तुम्हाला पासपोर्ट, पॅनकार्ड, रेशनकार्ड, पीडीएस फोटो कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादींची आवश्यकता आहे. UIDAI च्या यादीत एकूण 32 ओळखपत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात तुमचे नाव आणि फोटो असणे अनिवार्य आहे.
जन्मतारीख कशी अपडेट कराल?
आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. यासाठी तुम्हाला ssup.uidai.gov.in/ssup/ या लिंकवर क्लिक करु शकता. यात अपडेट करण्यापूर्वी तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक द्यावा लागेल. यानंतर captcha किंवा वेरिफिकेशन कार्ड भरावे लागेल.यानंतर ‘Send OTP’ वर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठविला जाईल. हा ओटीपीसाठी दिलेल्या जागी भरा आणि submit बटणावर क्लिक करा. यामुळे तुमचे लॉगिन पूर्ण होईल. यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर आधार कार्डची संपूर्ण तपशिलवार माहिती दिसेल. यात तुम्हाला जन्मतारीख अपडेट करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. तो अपडेट केल्यावर त्याला आवश्यक असणारी स्कॅन केलेली कागदपत्र जोडून ती अपलोड करा. यानंतर Submit बटणावर क्लिक करा. यानुसार तुमचे आधार कार्ड अपडेट करण्याचे काम पूर्ण होईल. याबाबतचा एक मेसेजही तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविला जाईल.
Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?
Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?