नाशिक : जिल्ह्यातील लिलावती रुग्णालयात (Hospital) घुसून व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या डॉक्टरच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. ही घटना नाशिकच्या (Nashik) म्हसरूळ परिसरातील लिलावती रुग्णालयात घडली आहे. मारहाण झालेला डॉक्टर (Doctor) अरुण विभांडीक यांचा मुलगा आहे. मारहाण आणि तोडफोड केल्यानंतर मारहाण करणारा फरार झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विभांडीक यांच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, उपचारासाठी आरोपीनं त्याच्या मित्राला रुग्णालयात आणलं होतं. मात्र, उपचार करण्यास डॉक्टरांनी विलंब केल्याने तोडफोड आणि मारहाण आरोपीनं केलीय. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापूर्वी देखील डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार घडले आहेत. दरम्यान, नाशिकमधील डॉक्टरांच्या मुलाला झालेल्या मारहाणीचा प्रकार धक्कादायक आहे.
नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील लिलावती रुग्णालयात डॉक्टरच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत मारहाण झालेला डॉक्टर अरुण विभांडीक यांचा मुलगा आहे. उपचारासाठी आरोपीनं त्याच्या मित्राला रुग्णालयात आणलं होतं. मात्र, उपचार करण्यास डॉक्टरांनी विलंब केल्याने तोडफोड आणि मारहाण आरोपीनं केलीय. मात्र, आरोपी फरार झालाय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नाशिकमधील ही मारहाणीची आताची घटना असली तरी यापूर्वी रुग्णालयात जाऊन मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नाशिकमधील या मारहाणीमुळे पुन्हा एकदा डॉक्टरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अशा प्रकारे दिवसाढवळ्या रुग्णालयात घुसून मारहाण करणे, यासारख्या घटनेमुळे पोलिसांचा वचक कमी राहिल्याचं दिसतंय. तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही उभा राहतोय.
रुग्णालयात घुसून अशा प्रकारे मारहाण केल्यानं शहरात परिसरात भीतीचं वातावरण आहे. मारहाण झालेला डॉक्टर अरुण विभांडीक यांच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता मारहाण आणि तोडफोड केल्यानंतर मारहाण करणारा फरार झाला आहे. आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांना सीसीटीव्हीमधील फुटेजचीही मदत होतेय. मात्र, नाशिकमधील रुग्णालयात घुसून तोडफोड केल्याच्या घटनेमुळे दहशतीच वातावरण निर्माण झालंय. आता यावर पोलीस काय निर्णय घेतात. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काय आवश्यक ते पाऊल उचलतात. याकडेही शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. आशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रयत्न व्हायला हावेत.
इतर बातम्या