Nashik | आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा आज होणारा दीक्षांत समारंभ पुढे ढकलला, कुलसचिवांनी काय दिली माहिती?

| Updated on: Feb 07, 2022 | 7:11 AM

राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा आज होणारा एकविसावा दीक्षांत समारंभ कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी दिली.

Nashik | आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा आज होणारा दीक्षांत समारंभ पुढे ढकलला, कुलसचिवांनी काय दिली माहिती?
Maharashtra University of Health Sciences, Nashik
Follow us on

नाशिकः राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा (Maharashtra University of Health Sciences) एकविसावा दीक्षांत समारंभ सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 रोजी होणार होता. मात्र, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी दिली. विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ सोमवारी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन संपन्न होणार होता. या समारंभास विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) आदी मान्यवर ऑनलाईन उपस्थित राहणार होते. मात्र, हा कार्यक्रम आता पुढे ढकलण्यात आला आहे.

98 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले की, विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 10236 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 98 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, एक रोख रक्कम पारितोषिक व 38 विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात येणार आहे. मात्र, लतादीदींच्या निधनामुळे तूर्तास हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. नव्या कार्यक्रमाची तारीख लवकरच कळवण्यात येईल. त्या कार्यक्रमात विद्यापीठांना पदविका, पदवी देण्यात येईल. त्यांना गौरविण्यातही येईल.

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ सोमवारी होणार होता. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री अमित देशमुख आदी मान्यवर ऑनलाईन उपस्थित राहणार होते. मात्र, लतादीदींच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे हा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे.

-डॉ. कालिदास चव्हाण, कुलसचिव

लवरच तारीख जाहीर होणार

– 10236 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार.

– 98 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान केले जाणार.

– 38 विद्यार्थ्यांचा पीएच.डी.ने होणार आहे गौरव.

– कार्यक्रमाची लवकरच तारीख जाहीर होणार.

इतर बातम्याः

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास

Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली