नाशिकमध्ये आणखी एक कोरोना बळी; रुग्णांमध्ये घट, जाणून घ्या आजचा रिपोर्ट

| Updated on: Feb 17, 2022 | 3:18 PM

नाशिक जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.05 टक्के,नाशिक शहरात 98.42 टक्के, मालेगावमध्ये 97.28 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.99 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.88 टक्के इतके आहे. कोरोनाने नाशिक ग्रामीणमध्ये आतापर्यंत 4 हजार 295 जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिकमध्ये आणखी एक कोरोना बळी; रुग्णांमध्ये घट, जाणून घ्या आजचा रिपोर्ट
Corona patients
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) कोरोनाच्या (Corona) दोन्ही लाटा भीषण होत्या. तिसऱ्या लाटेत ओमिक्रॉनमुळे (Omicron) रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमीय. मात्र, गेल्या आठवड्यात 33 रुग्णांचा मृत्यू झाला. 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान हे बळी गेले. यातले 18 मृत्यू हे नाशिक महापालिका क्षेत्रात तर 16 मृत्यू हे नाशिकच्या ग्रामीण भागात झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सोमवारी, 14 फेब्रुवारी रोजी सुद्धा 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. मंगळवारी, 15 फेब्रुवारी रोजीही 4 जणांचा मृत्यू झाला. आता बुधवारी, 16 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज गुरुवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 64 हजार 935 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 1 हजार 167 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 113 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 883 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

कोठे आहेत रुग्ण?

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 83, बागलाण 61, चांदवड 49, देवळा 31, दिंडोरी 71, इगतपुरी 37, कळवण 61, मालेगाव 19, नांदगाव 33, निफाड 136, पेठ 26, सिन्नर 109, सुरगाणा 64, त्र्यंबकेश्वर 51, येवला 81 असे एकूण 912 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 200, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 14 तर जिल्ह्याबाहेरील 41 रुग्ण असून असे एकूण 1 हजार 167 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 74 हजार 985 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक 3, बागलाण 2, चांदवड 1, दिंडोरी 2, निफाड 2, पेठ 1, सिन्नर 4, सुरगाणा 2, त्र्यंबकेश्वर 1, येवला 5 असे एकूण 23 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

बरे होण्याची टक्केवारी किती?

नाशिक जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.05 टक्के,नाशिक शहरात 98.42 टक्के, मालेगावमध्ये 97.28 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.99 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.88 टक्के इतके आहे. कोरोनाने नाशिक ग्रामीणमध्ये आतापर्यंत 4 हजार 295 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 98, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 364 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 883 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्याचे चित्र…

– 4 लाख 74 हजार 985 एकूण कोरोनाबाधित.
– एकूण रुग्णांपैकी 4 लाख 64 हजार 935 जणांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले 1 हजार 167 पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.88 टक्के.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!