नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात कोरोनाची (Corona) आकडेवारी वाढताना दिसत आहे. मात्र, यातील बहुतांशी रुग्ण (Patient) घरच्या घरी ठणठणीत होत असल्याने बहुचर्चित अशा तिसऱ्या लाटेची भीती टळल्याचे समोर येत आहे. सध्या महापालिका क्षेत्रासह नाशिक, निफाड, सिन्नर आणि दिंडोरीमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे समोर येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 25 हजार 918 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 16 हजार 987 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
येथे वाढतायत रुग्ण
उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 953, बागलाण 228, चांदवड 287, देवळा 379, दिंडोरी 439, इगतपुरी 282, कळवण 144, मालेगाव 192, नांदगाव 301, निफाड 850, पेठ 108, सिन्नर 651, सुरगाणा 63, त्र्यंबकेश्वर 225, येवला 296 असे एकूण 5 हजार 398 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 10 हजार 984, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 332 तर जिल्ह्याबाहेरील 273 रुग्ण असून असे एकूण 16 हजार 987 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 51 हजार 688 रुग्ण आढळून आले आहेत. तर नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक 170, बागलाण 54, चांदवड 34, देवळा 23, दिंडोरी 53, इगतपुरी 20, कळवण 27, मालेगाव 55, नांदगाव 13, निफाड 97, पेठ 18, सिन्नर 52, सुरगाणा 11, त्र्यंबकेश्वर 23, येवला 17 असे एकूण 667 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
नाशिक जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 94.26 टक्के, नाशिक शहरात 94.19 टक्के, मालेगावमध्ये 94.89 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 94.73 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.29 टक्के इतके आहे.
मृत्यूची आकडेवारी
नाशिक ग्रामीणमध्ये कोरोनाने आतापर्यंत 4 हजार 258 नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 41, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्हा ठळक
– 4 लाख 51 हजार 688 एकूण कोरोनाबाधित.
– 4 लाख 25 हजार 918 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले 16 हजार 987 पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 94.29 टक्के.
Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!
Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना