ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सिव्हिलचा महत्वाचा निर्णय, ओपीडीच्या वेळेत असा आहे बदल…

| Updated on: Nov 02, 2022 | 4:01 PM

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाने ओपिडीच्या वेळेत बदल केला असून यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय टळणार आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सिव्हिलचा महत्वाचा निर्णय, ओपीडीच्या वेळेत असा आहे बदल...
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची होणारी हेळसांड बघता ओपीडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागाच्या वेळेत बदल केला गेला आहे. आजपासून बाह्यरुग्ण विभाग सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत सुरू राहणार आहे. या वेळेत ग्रामीणभागासह शहरी भागातील नागरिकांची होणारी गैरसोय टळणार असल्याचा अंदाज बांधला गेला आहे., या आधी सकाळी 08.30 ते दुपारी 12.30 पर्यन्त आणि दुपारी 04 ते सायंकाळी 06 पर्यन्त ओपिडी सुरू असायची. त्यात आता जेवणाचा वेळ देखील कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय या वेळेत पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध राहणार असून या वेळेत तपासणी केली जाणार आहे. याशिवाय शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे.

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाने ओपिडीच्या वेळेत बदल केला असून यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय टळणार आहे.

ग्रामीण भागासह शहरातील रुग्णांना आता सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यन्त बाह्य रुग्ण सेवा उपलब्ध राहणार असून या काळात पूर्ण वेळ डॉक्टर उपलब्ध राहणार आहे.

या पूर्वी सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 आणि त्यानंतर दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बाह्य रुग्ण सेवा होती.

ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना अनेकदा ताटकळत बसावे लागत होते, त्यांना या नव्या वेळेच्यानुसार उपचार आणि तपासणी करता करण्यास मदत होणार आहे.

पूर्वीच्या वेळेबाबत अनेकदा तक्रारी देखील आलेल्या होत्या, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत ओपीडीच्या वेळेत बदल केला नव्हता.

ग्रामीण भागातील बहुतांशी रुग्ण सकाळी रुग्णालयात येतात. या रुग्णांना आता वेळेत तपासणी करून आपल्या घरी जाता येणार आहे.