नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीपैकी (Nagar Panchayat) 3 ठिकाणी शिवसेनेचे (Shiv Sena) नगराध्यक्ष झाले, 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, तर भाजपला केवळ एका ठिकाणावर समाधान मानावे लागले. दिंडोरीत केंद्रीय मंत्री भारती पवारांना धक्का बसला असून, येथे नगराध्यक्षपद अपेक्षेप्रमाणे शिवसेनेकडे गेले आहे. कळवण, देवळा, निफाडमध्ये नगराध्यक्ष बिनविरोध निवडला गेला आहे. कारण या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी फक्त एकेक अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे कळवणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कौतिक पगार आणि उपनगराध्यक्षपदी हर्षाली पगार यांची निवड झाली. निफाडमध्ये शहरविकास आघाडीच्या रूपाली गंधवे आणि उपनगराध्यक्षपदी अनिल कुंदे यांची निवड झाली. देवळा येथे नगराध्यक्षपदी भाजपच्या भारती अशोक आहेर आणि उपनगराध्यक्षपदी जितेंद्र आहेर यांची निवड झाली.
पेठ राष्ट्रवादीकडे
उर्वरित तीन ठिकाणांपैकी दिंडोरीत शिवसेनेच्या मेघा धिंदळे यांनी बाजी मारली. तर उपनगराध्यक्षपदी अविनाश जावध यांची निवड झाली. पेठमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगराध्यपद गेले. येथे करण करवंदे यांची निवड झाली. उपनगराध्यक्षपदी माकपच्या अफ्रोज शेख निवडल्या. सुरगाण्यात शिवसेनेचे भारत वाघमारे नगराध्यक्ष झाले असून, माकपच्या माधवी थोरात यांनी उपनगराध्यक्ष पद मिळाले.
डॉ. भारती पवारांना धक्का
दिंडोरीत केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना जोरदार धक्का बसला आहे. या ठिकाणी 17 पैकी 6 जागा मिळवून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस येथे एकत्र आले. त्यामुळे नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या मेघा धिंदळे यांनी बाजी मारली. तर उपनगराध्यक्षपदी अविनाश जावध यांची निवड झाली. विशेष म्हणजे दिंडोरी हा डॉ. भारती पवार यांचा लोकसभा मतदार संघ असून, त्यांचे येथे मजबूत जाळे आहे.
चिठ्ठीचा कौल सेनेला
सुरगाणा येथे शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली आहे. चिठ्ठीचा कौल शिवसेनेला मिळाला. त्यामुळे भरत वाघमारे विजयी झाले. त्यांनी भाजपचे विजय कानडे यांचा पराभव केला. सुरगाणा येथील भाजप नगरसेविका काशीबाई पवार यांचा सहलीदरम्यान हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या उमेदवाराला समसमान मते मिळाली. अखेर चिठ्ठी टाकून नगराध्यक्ष पदाचा निकाल घोषित करण्यात आला.
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!