नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सातपूर औद्योगिक वसाहतीतल्या निलराज कारखान्यात लागलेल्या आगीत (Fire) पहिला मजला जळून खाक झाला आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, कुठलिही जीवित हानी झाली नाही. आज बुधवारी, 2 फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्याचे समजताच महापालिकेच्या अग्निशमन दलास संपर्क साधण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाचे 3 बंब, एमआयडीसीचा 1 बंब, महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचा 1 बंबासह इतरही बंब घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह एकूण 25 जणांनी मिळून ही आग विझवली. या घटनेत कंपनीचा पहिला मजला जळून खाक झाला आहे. आगीत कॅपॅसिटर बसवण्यासाठी लागणारा लाखो रुपयांचा कच्चा माल जळाल्याचे समजते. घटनास्थळी महापालिकेच्या अग्निशमन केंद्राचे प्रमुख राजेंद्र बैरागी, पी. जी. परदेशी, आर. ए. लाड आदी उपस्थित होते.
आग कशामुळे लागली?
सातपूर औद्योगिक वसाहतीत निलराज इंडस्ट्रीमध्ये लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागली की आणखी कशामुळे याचा शोध सुरू आहे. मात्र, आगीत कसलिही जीवित हानी झाली नाही. त्यामुळे कंपनी प्रशासन आणि महापालिका प्रशासनानानेही सुटकेचा निश्वास सोडला आहे. पहाटे लागलेली आग सकाळी बराच वेळ भडकत होती. साधरणतः दहा वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. ही घटना कंपनीतील कामगार असताना घडली असती, तर मोठा अनर्थ ओढावला असता.
थंडीच्या दिवसांमध्ये का लागते आग?
आग लागण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे वारा. त्याची गती आणि त्याची वाहण्याची दिशा. जास्त आणि कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे वाऱ्याची गती आणि दिशा सतत बदलत असते. जेव्हा कमी व जास्त दाबाचा पट्टा तयार होतो तेव्हा तिथे तापमान विसंगती तयार होते. अशावेळी थंड हवेचा पट्टा त्याच्याबरोबर किंवा त्याच्यासमोर असणाऱ्या उष्ण हवेला पुढे ढकलत राहतो. या ‘धक्क्या’मुळे आगीची तीव्रता अनेक पटीने वाढते. अशात आग आपली दिशा सतत बदलत असल्यामुळे ती चहुबाजूला पसरते.
आग लागण्याचे नेमकी कारणे काय?
– सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा इंधन, ऑक्सिजन आणि उष्णता या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा आग तयार होते. अशात थंडीत मात्र हवेत गारवा असतो. पण तरीदेखील आगीच्या घटना समोर येणे ही चिंतेची बाब आहे. आता आग नेमकी कोणत्या कारणाने लागू शकते याचाही विचार करणे महत्त्वाचे आहे.
– जंगलांमध्ये झाडांना आग लागणे हे नैसर्गिक असून शकते. इथे झाडे आणि फांद्यामध्ये घर्षण झाल्याने उष्णता निर्माण होते आग लागते.
– घरात जर आग लागली तर त्याचं कारण निष्काळजीपणा असून शकतो. गॅस चालू असणं, वीजेचा शॉक सर्कीट होणं, स्टोव्हचा वापर यामुळे आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
– पेट घेणारी रसायने, पेट्रोलियम पदार्थ, विजेंच्या तारांची चुकीच्या पद्धतीने मांडणी केली तरीदेखील आग पेटते. सध्या मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचा वापर केला जातो. थंडीत आग लागण्याचे हे मुख्य कारण असू शकते.
– एखाद्या घरात , कंपनीत किंवा इतर कुठेही पेट घेणाऱ्या वस्तू अस्तव्यस्त पडल्या असतील आणि त्याचा आगीशी संबंध आला तर त्याने मोठे आगीचे लोळ पसरतात.
– अशात सिगारेट ओढून कुठेही फेकणे, सार्वजनिक ठिकाणी ती न विझवता फेकण्यामुळे अनेक आगीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.
– फटाक्यांच्या वापरामुळेही आग लागते.
इतर बातम्याः
Nashik | प्रारूप प्रभाग रचनेत धक्क्यावर धक्के, अनेक नगरसेवक गॅसवर; महापौरांनाही जोर का झटका धीरे से…
टेन्शन खल्लास, नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल मुलांचे आधार कार्ड; काय आहे योजना?
Nashik | ‘महाडीबीटी’ पोर्टल संथ, विद्यार्थी हैराण; शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?