नाशिकः नाशिकमधील (Nashik) महसूल विभागात (Revenue Department) खळबळ माजविणारे एक प्रकरण समोर आले आहे. अपर जिल्हाधिकाऱ्याच्या (Additional Collector) घरातून तब्बल एक-दोन नव्हे, तर 175 फाईल ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. शिवाय अजून काही फाईलचा शोध सुरू असल्याचे समजते. या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहे. या झाडाझडतीतून बरेच काही बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता संबंधित अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला, तर अनेकजण मोबाईलवर सुद्धा उपलब्ध झाले नाहीत.
नेमके प्रकरण काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपर जिल्हाधिकारी दत्त प्रसाद नडे यांच्या घरातून या फाईल ताब्यात घेण्यात आल्या आहेत. नडे यांचे गोल्फ क्लबजवळ शासकीय निवासस्थान आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या घराजवळच दुसरेही एक शासकीय निवासस्थान आहे. त्या ठिकाणीही नडे यांचा राबता असल्याचे समजते. विशेष म्हणजे या घरात काही कार्यालयीन फाईलवर सह्या गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. या साऱ्या फाईल या जमीन व्यवहराराशी निगडित आहेत. त्याबाबत मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत. तशा तक्रारी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केल्याचे समजते.
असा आला संशय
महसूलमधील अनेक फाईलची प्रकरणे गेल्या कित्येक दिवसांपासून बासनात गुंडाळण्यात आली होती. मात्र, काही फाईल अतिशय सुटकीसरशा मंजूर केल्या जात होत्या. या साऱ्या फाईल या जमीन व्यवहाराच्या होत्या. त्या नडे यांनी ताब्यात घेतलेल्या निवासस्थानात मंजूर केल्या जायच्या, अशी चर्चा होती. त्यानंतर तशा तक्रारी अनेकांनी विभागीय आयुक्तांकडे केल्या होत्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली. त्यामुळे महसूलमधील अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. याविषयी चौकशी होणार का, याबद्दल उत्सुकता आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा संपर्क होऊ शकला नाही.
चौकशी होणार का?
-अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानातून फाईल ताब्यात.
-जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे उडाली खबळ.
-सर्वच्या सर्व फाईल या जमीन व्यवहाराबाबतच्या असल्याची शक्यता.
-विभागीय आयुक्तांकडे अनेकांनी केल्या होत्या तक्रारी.
Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!
Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना