नाशिक : बेड न मिळाल्यामुळे एका तरुणाने नाशिकमधील रुग्णालयाच्या दारातच प्राण सोडले. मन सुन्न करणारी ही धक्कादायक घटना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात घडली आहे. पत्नीच्या डोळ्यांदेखत पतीने अखेरचा श्वास घेतल्याने उपस्थितांचेही काळीज पिळवटून निघाले. (Nashik man dies outside Chandvad Hospital in front of wife)
अरुण माळी असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अरुणला त्रास होऊ लागल्यानंतर पत्नी सुरेखा त्याला घेऊन रुग्णालयात आली होती. बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी त्याला रुग्णालयाबाहेर येऊन चेक केले. अरुणच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल खूपच कमी झाली होती. त्यामुळे उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ :
नाशिकमध्ये ऑक्सिजन पुरवठ्या अभावी 22 जणांचा मृत्यू
नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात (Nashik Zakir Hussain hospital) ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे ऑक्सिजनअभावी 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना कालच घडली होती. रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकमधून गळती झाल्याने हजारो लीटर लिक्वीड स्वरुपातील ऑक्सिजन वाया गेले. यावेळी रुग्णालयात अनेक कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरु होते. यातील 150 जण व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयात अचानक ऑक्सिजन लीक झाल्याने रुग्णांना होणारा पुरवठा बंद झाला. त्यामुळे व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांपैकी 22 जणांचा तडफडून मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या प्रेशरमुळं नोझल तुटून ही ऑक्सिजन गळती झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
संबंधित बातम्या :
नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संपूर्ण यादी
(Nashik man dies outside Chandvad Hospital in front of wife)