नाशिक : राज्यात महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकदिलाने काम करत असताना नाशिकमध्ये मात्र हेच पक्ष एकमेकांविरोधात उभे टाकण्याची शक्यता वर्तवली जातेय. शनिवारी (26 डिसेंबर) येथे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ‘एकला चलो’च्या भूमिकेवर जोर दिल्याने पेच आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जातेय. (nashik municipal corporation election congress Will contest independently)
नाशिक शहरात काँग्रेसच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर सखोल चर्चा झाली. यावेळी जिंकण्याची शक्यता तसेच, बलस्थानांवर खलबतं झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, आगामी महापालिका निवडणुकीत कुणाशीही आघाडी न करता स्वतंत्ररीत्या लढवण्याची मागणीही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी यावेळी केली. काँग्रेसच्या याच भूमिकेमुळे आता नाशिकच्या महाविकास आघाडीला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसने आयोजित केलेल्या या बैठकीत काँग्रेसच्या आमदारांसोबतच अनेक स्थानिक नेते अपस्थित होते. यावेळी स्थानिक नेते आणि नगरसेवकांनी निवडणूक महापालिका आघाडीत लढवण्यास विरोध केला. तर आमदार हिरामण खोसकर यांनी नाशिक महानगरपालिकेचा आगामी महोपौर हा काँग्रेसचाच असणार असा ठामपणे दावा केला.
दरम्यान, आज (शनिवार 26 डिसेंबर) काँग्रेससोबतच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचीही स्वतंत्रपणे बैठक झाली. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही आघाडीमध्ये निवडणूक न लढवता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची मागणी केली. तसेच, या बैठकीत शिवसेनेनेही स्वबळाचा नारा देत महापालिकेचा महोपौर फक्त शिवसेनेचाच असेल असा दावा केला. राष्ट्रवादीनेही यापूर्वीच स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे नाशिकमधील आगामी राजकीय गणितं काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेससोबतच येथील शिवसेना कार्यालयात शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेकूडन स्वबळावर लढण्यासाठीची चाचपणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचबरोबरच मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाची मिमांसा या बैठकीत केली गेली. दरम्यान, आगामी महापालिका निवडणूक स्वबळावरच लढवावी अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मागणीवर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या बैठकीला शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर आदी नेते उपस्थित होते.
पुढच्या 5 दिवसांत रेल्वे प्रवाशांसाठी Good News, तिकिटांबाबत मोठी घोषणाhttps://t.co/N7Zp4hyp5V
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 26, 2020
संबंधित बातम्या :
चंद्रकात पाटील म्हणजे चंपारण्यातील पात्र : वडेट्टीवार
नाशकात शिवसेनेची स्वबळाची चाचपणी, काँग्रेसचीही बैठक, मविआचं काय होणार?
…तर प्रवाशांना त्यांच्या खर्चाने क्वारंटाईन करुन काय साधणार?, अबू आझमींचे उद्धव ठाकरेंना पत्र
(nashik municipal corporation election congress Will contest independently)