प्रशासकीय राजवटीला वर्षपूर्ती, आपचं उपहासात्मक आंदोलन, का होतेय आंदोलनाची चर्चा ? VIDEO व्हायरल

| Updated on: Mar 16, 2023 | 10:54 AM

नाशिक महानगर पालिकेत प्रशासकीय राजवट येऊन एक वर्षे पूर्ण झाल्याने आम आदमी पार्टीने केलेल्या आंदोलनाची जोरदार चर्चा होत असून सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल झाले आहे.

प्रशासकीय राजवटीला वर्षपूर्ती, आपचं उपहासात्मक आंदोलन, का होतेय आंदोलनाची चर्चा ? VIDEO व्हायरल
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : प्रशासकीय राजवट आहे ओके ओके… नाशिककर म्हणतात नॉट ओके ओके… प्रशासकीय अधिकाऱ्यांना मिळतात खोके खोके असं म्हणत आम आदमी पक्षाच्या वतीने नाशिकमध्ये भन्नाट आंदोलन केले आहे. या आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून जोरदार चर्चा होत आहे. नाशिक महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी केक आणून अनोखं आंदोलन केले आहे. नाशिक महानगर पालिकेत प्रशासकीय राजवट येऊन एक वर्षे पूर्ण झाल्याने त्याचाव वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. त्यावेळी प्रशासकीय राजवटीवरुन सरकारचा निषेध करण्यासाठी आपने आंदोलन केले आहे.

आम आदमी पार्टीने प्रशासकीय राजवटीवरुन सरकारला चांगलेच टोले लगावले आहे. यामध्ये जो केक आणण्यात आला होता त्यावर मनपा प्रशासक लिहून तो केक कापला आहे. त्यानंतर वाढदिवसाचे गाणे म्हणत असतांना सरकारला कोपरखळी लगावली आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिक महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर आपने केक कापला. त्यानंतर हॅप्पी बर्थडे मनपा प्रशासक म्हणत प्रशासकीय राजवट आहे ओके ओके… नाशिककर म्हणतात नॉट ओके ओके… प्रशासकीय अधिकाऱ्यांना मिळतात खोके खोके अशी जहरी टीका केली आहे.

आम आदमीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आल्यानंतर त्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केले होते. त्यावरून नागरिकही हे व्हिडिओ व्हायरल करत प्रशासकीय राजवटीवरुन उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.

वर्षे उलटून गेले तरी अद्यापही निवडणुका घेतल्या जात नसल्याने नागरिकही प्रतिक्रिया देत व्यक्त होऊ लागली आहे. सोशल मिडियावर या वर्षपूर्तीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्यातच आम आदमी पक्षाने केलेले उपहासात्मक आंदोलन चर्चेचा विषय ठरत आहे.

एक वर्षे उलटून गेले माजी नगर सेवक यांचा जीव टांगणीला लागला आहे. निवडणुका होत नसल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सांभाळण्यात इच्छुक उमेदवाराचा खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे निवडणुका कधी होणार ? अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

वेगवेगळ्या कारणाने निवडणुका पुढे ढकलत असल्याने बघता बघता प्रशासकीय राजवटीला एक वर्षे पूर्ण झाले आहे. त्यामध्ये आता वर्षे पूर्ण झाल्याने माजी नगरसेवक यांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला आहे. अशातच सरकारला जाग आणायची म्हणून आपने आंदोलन केले आहे.

गेल्या एक वर्षापासून नाशिक महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील अन्यत्र महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने, शहरांमधील विकास कामे थांबल्याने, प्रशासकीय राजवट संपुष्टात आणावी ही मागणी करत पालिकेच्या प्रवेशद्वारावर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

सरकार ला जाग येण्यासाठी आम आदमी पार्टी च्या कार्यकर्तांनी केक कापून प्रशासकीय राजवट हटवा आणि लोकप्रतिनिधींची राजवट येण्यासाठी निवडणुका जाहीर करा अशी मागणी केली आहे. याचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.