नाशिक : शिंदे सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केले आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत भाष्य करत असतांना त्यांनी स्वतः निवडणुकीला कुत्रा या चिन्हा समोर उभा राहिलो तरी निवडून येईल असे वक्तव्य केले आहे. यापूर्वीही अब्दुल सत्तार यांनी हे विधान केले होते. खरंतर ठाकरे गटाच्या आरोपवर बोलत असतांना त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी त्यावेळी वक्तव्य केले होते. आता पुन्हा खळबळ जनक वक्तव्य केले असून याच वेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या संदर्भातही प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणत्याही क्षणी लागल्याची शक्यता असतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी हे भाष्य केले आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये निकाल कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये साधारणपणे 15 मे पर्यन्त हा निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल काय असणार याकडे संपूर्ण राज्यसह देशाचे लक्ष लागून आहे.
त्याच पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार 16 आमदार अपात्रतेच्या संदर्भात बोलत असतांना मोठं वक्तव्य केले आहे. सत्तार म्हणाले, आता आमचे कॅप्टनच गेले तर बाकी काही बघण्याचा प्रश्नच नसतो, त्या सोळा आमदारांमध्ये मी देखील आहे. राजकारणात प्लॅन A , प्लॅन B असतो, प्लॅन प्रमाणेच घडते असं काही नाही.
आम्ही गेलो तरी इतिहास राहणार, आम्ही राहिलो तरी इतिहास राहणार. आमचे पन्ने इतिहासात लिहिले जाणार. हा निर्णय देशासाठी लागू होईल. सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्ही हसता खेळता मान्य करू असेही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिकमध्ये म्हंटलं आहे.
मला काही निकालाची धास्ती नाही. आपली लोकल गाडी आहे. हात दाखवा आणि गाडी थांबवा. मी कुत्रा निशाणी वर लढलो तरी सत्तार आमदार पक्का आहे असे पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारे वक्तव्य कृषीमंत्री यांनी केले आहे. अब्दुल सत्तार यांनी यापूर्वीही चिन्हावरुन असं वक्तव्य केले होते.
त्यामुळे आगामी काळात काय घडमोडी घडतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून असतांना महाराष्ट्रातील निकाल काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतांना सोळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा महत्वाचा मानला जात आहे. त्यामध्ये स्वतः अब्दुल सत्तार हे देखील आहे. त्यामुळे आगामी काळात मी कुत्रा निशाणीवर जरी लढलो तरी निवडून येईल म्हणत सत्तार यांनी खळबळ उडवून दिली आहे.