नाशिक : नाशिकच्या सिन्नर येथील महामार्गावर एक अपघाती निधन झाले आहे. यामध्ये सुट्टीवर आलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. खंबाळे येथील लष्करी जवान जितेंद्र संपत आंधळे यांचा अपघाती निधन झाले आहे. अवघ्या 28 वर्षीय जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहल व्यक्त केली जात असून पंचक्रोशीत हळहल व्यक्त केली जात आहे. गुरुवारी आपल्या पत्नी ज्योतीसह सात वर्षीय मुलगा पीयूष आणि तीन वर्षाची मुलगी आरोही यांना मानोरीला सासुरवाडीला सोडून गावी चालले होते. त्यातच नांदूर शिंगोटे बायपासजवळ त्यांचा अपघात झाला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा साडूही होता त्यात ते जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू झाली आहे.
सुट्टीवर आलेले जवान सासुरवाडीला गेले होते. पत्नीसह मुलांना सोडून गावी परतत होते. सोबत पाठीमागील साडू ज्ञानेश्वर सांगळे बसलेले होते. त्यामध्ये सांगळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
सासुरवाडी वरुन निघत नातेवाईकांना भेटण्यासाठी ते नांदूर शिंगोटे येथे चालले होते. रात्री दीड वाजेची वेळ होती. बायपास समोरून येणाऱ्या कारचा उजेड त्यांच्या डोळ्यावर पडला आणि त्यानंतर त्यांनी दुचाकी थेट रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकला जाऊन धडकली.
यामध्ये त्यांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. त्यात आंधळे यांचा अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अपघातात जवाणाचा मृत्यू झाला आहे तर साडू ज्ञानेश्वर आंधळे जखमी आहे.
आंधळे हे लष्करी जवान होते. 23 मराठा त्यांचे युनिट होते. केरळ येथे सध्या त्यांची नोकरी सुरू होती. कर्नाटक येथे नुकतीच त्यांची बदली झाली होती. त्यानुसार त्यानी बदली झाल्यानंतर पत्नीसह मुलांना गावी सोडून ते लवकरच कर्नाटकला जाणार होते.
त्यामुळे नव्या ठिकाणी पोस्टिंग झाल्यावर जितेंद्र हे सुट्टीवर आले होते. सुट्टी संपवून ते कर्नाटकला जाणार होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून पंचक्रोशीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
काही आठवड्यांपूर्वी सिन्नर येथील जवाणाचा कालव्यात पडून मृत्यू झाला होता. त्यावेळी जवानाणे दोन्ही मुलींसह पत्नीला वाचविले होते. त्यात स्वतःचे प्राण वाचविता आले नव्हते. तब्बल 20 तासांनी त्यांच्या मृतदेह सापडला होता. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या जवाणाचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.