नाशिक : काही राजकीय व्यक्ती अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी किंवा त्यांना डिवचण्यासाठी माहिती मागवित असतात. त्यामुळे अधिकारीही अडचणीत येऊ नये म्हणून राजकीय व्यक्तींची मागणी पूर्ण करत असतात. पण नाशिकमध्ये एका अनोखा प्रकार समोर आला असून त्याची संपूर्ण नाशिकसह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या एका पदाढीकाऱ्याला माहिती मागविणे चांगलेच महागात पडले आहे. अधिकाऱ्यांनी हा कोंडीत पकडण्याच्या दृष्टीने माहिती मागविण्याचा भाग असू शकतो म्हणून अधिकाऱ्यांनी खोडी केली आहे. थेट ज्या माजी नगरसेवक पदाधिकाऱ्याने माहिती मागितली त्याचे घरंही अनधिकृत असल्याची माहिती देण्याचे काम केलं आहे.
खरंतर ठाकरे गटाचे हे पदाधिकारी माजी नगरसेवक आहेत. त्यांनी दूध बाजार पासून ते सारडा सर्कल पर्यन्त किती अतिक्रमण आहे याची माहिती मागितली होती. यामागील उद्देश अधिकाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी मुद्दामहून अधिकची माहिती संकलित करत संबंधित पदाधिकाऱ्याला पाठविली.
खरंतर पदाधिकाऱ्याने मागवलेल्या माहितीचा हेतु लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनीही खोडी केली. सारडा सर्कल ते दूध बाजार इतकीच माहिती मागवलेल्या पदाधिकारऱ्याला थेट त्याच्या घरापर्यन्त अतिक्रमण असल्याची माहिती देत धक्का दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
खरंतर हे ठाकरे गटाचे पदाधिकारी शहराचे माजी महापौर राहिले आहे. त्यामुळे राजकीय गोटात या माहिती मागवून आलेल्या उत्तराची अशी काही चर्चा होऊ लागली की त्यामुळे घराच्या बाहेर पडणं कठीण झाले आहे. राज्यात सध्या अतिक्रमणाचा मुद्दा गाजत असतांना नाशिकमधील अतिक्रमण विभागाने दिलेली माहीती चर्चेत आली आहे.
नाशिक शहरातील ज्या भागाची माहिती मागविण्यात आली होती. तो परिसरात वर्दळीचा परिसर आहे. रस्त्यावर हातविक्री करणारे अनेक लोक हातगाडी घेऊन उभे असतात. त्यात आता रमजानचा महिना सुरू होणार असल्याने आणखी गर्दी या परिसरात होत असते. त्यामुळे वाहनं घेऊन जाणे सुद्धा कठीण होत असते.
त्यामुळे या परिसरात अतिक्रमण काढावे अशी मागणी अनेकदा केली गेली आहे. मात्र, अधिकारी याकडे का कानाडोळा करतात याचे उत्तर कधीच मिळत नाही. पण हीच बाब हेरून अधिकारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाने केल्याने तो त्याच्याच अंगलट आला आहे.
त्यामुळे आता माजी नगरसेवकाला स्वतःच्या घरासह अतिक्रमणाची माहिती दिली असतांना पुढील काळात काही कारवाई होते का ? हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.