नाशिक : संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी रामनवमीच्या दिवशी एक पोस्ट केली होती. त्यादरम्यान त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या काळाराम मंदिर येथील घटनेचा उल्लेख केला होता. त्यावरून सोशल मीडियासह ठिकठिकाणी त्यावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच मुद्द्याला घेऊन जितेंद्र आव्हाड हे नाशिक दौऱ्यावर आले होते. काळाराम मंदिरात दर्शन घेण्यासाठी आग्रही भूमिका मांडत वेदोक्त मंत्र हीच संकल्पना आता यापुढे कायम राहावी अशी मागणी करत जितेंद्र आव्हाड यांनी पुराणोक्त आणि वेदोक्त या दोन पद्धती वर भाष्य केले आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी यावेळेला कालीचरण महाराज यांच्यावरही सडकून टीका केली आहे. तर माध्यमांशी बोलत असतांना जितेंद्र आव्हाड म्हणाले काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार, महंतांना भेटणार आहे. ही व्यवस्था कधी संपणार या बद्दल विचारणार, हे किती दिवस चालणार आहे.
शाहू महाराज पुढारलेले विचारांचे होते. त्यांनी वैदिक शाळा काढली होती. कालच प्रकरण वेदोक्त, पुराणोक्त प्रकरण आणखी किती दिवस चालणार आहे. मी देव मानतो, मी धर्माभिमानी हिंदू आहे. पुराणोक्त प्रकरण आणखी किती दिवस चालणार आहे?अजूनही ही भूमिका असेल तर काढून टाकली पाहिजे.
संविधान प्रत मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी ठेवतो असं म्हणालो होतो ही माझी चूक आहे. संविधानाची उंची खूप आहे. आम्ही संविधान डोक्यावर ठेवतो. त्याच्यामुळे आम्ही जिवंत आहे. माझ्या हातून चूक झाली, मी अस बोलायला नको होतं असेही स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
जिथे महाराष्ट्राच्या गादीचा मान नाही तिथे आमचा काय? हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. हे मुद्दामहून केलं आहे. मंदिरात आम्ही जाणार आहे. मात्र तिथे घोषणा होणार नाही, अचानक सनातन धर्म की जय अश्या घोषणा कश्या सुरू झाल्या, ही कुठेतरी प्लॅन स्ट्रेटर्जी आहे. यातून काहीतरी शिका, बहुजनांना आव्हान आहे असेही आव्हाड म्हणाले.
कालीचारणची लायकी काय, त्याचे शिक्षण आहे काय ?देशातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे आहे. महात्मा गांधी बद्दल बोलणारा कालीचरण कोण? असा स्पष्ट शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण महाराजांवर सडकून टीका केली आहे.
नाशिकरना विनंती, काळाराम मंदिर हे जगात मोठं स्थान आहे याचं, इथूनच वेदोक्त सर्वांना लागू करा. उभ्या महाराष्ट्राला कळेल शूद्रांची काय हालत आहे. पोलिसांनी बळाचा वापर करून आम्हाला रोखलं, तर आम्ही शूद्र आहे, आणि हे महाराष्ट्राला कळेल. मला अडवण्याची चूक पोलिसांनी करू नये. हे राज्य सरकारचे पोलिस गुलाम आहेत असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटलं आहे.