नाशिक : साडेतीन शक्तीपीठा पैकी अर्धेपीठ म्हणून ओळख असलेल्या सप्तशृंगी देवीची सर्वत्र ओळख आहे. खान्देशचं कुलदैवत म्हणून या देवीची ओळख असून वणीची देवी म्हणूनही ओळखतात. याच सप्तशृंग गडावर आदिमायेच्या चैत्रोत्सवास काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पूर्वीच गडावरील कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. नाशिक वर्कर्स युनियनचे कर्मचारी येत्या शुक्रवार पासून म्हणजेच 24 मार्च पासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहे. आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे तोंडावर आलेल्या चैत्रोत्सवा दरम्यान हा संप होणार असल्याने दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
नाशिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस तुकाराम सोनजे यांनी याबाबत नोटिस देऊन संप करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळासह व्यवस्थापनाची चिंता वाढली असून यावर काही तोडगा निघतो का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
सप्तशृंग गडावरील चैत्रोत्सव म्हणजे देवीच्या भक्तांसाठी मांदियाळी असते. लाखो भाविक सप्तशृंग गडावर दर्शनासाठी येत असतात. या काळात मोठी गर्दी गडावर होत असते. त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी प्रशासनाची चांगलीच कोंडी केली आहे.
काही महिन्यांपूर्वीही कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्यावेळेला जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आणि विश्वास मंडळ यांनी चर्चा करत असतांना काही आश्वासने दिली होती. त्याची पूर्तता न केल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहे.
आता ऐन उत्सवाच्या दरम्यान कर्मचारी संपावर गेल्यास मोठी गैरसोय निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश तथा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई यांच्यासह अधिकाऱ्यांनी चर्चा केली होती त्यामध्येही चर्चा झेली होती.
सहा महीने उलटून गेले तरी अद्याप मागण्या मान्य न झाल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहे. नियमांना धरून आता आंदोलन केले जात असतांना मागण्या मान्य होत नसल्याने भावकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण भाविकांचे त्याकडे लक्ष लागून आहे.
मानधनासह विविध मागण्यांचे निवदेन युनियनच्या माध्यमातून देण्यात आले आहे. यापूर्वीही निवेदन देण्यात आले होते. मात्र त्या निवेदणाला केराची टोपली दाखवली गेली आहे. त्यामुळे हे संपाचे हत्यात उपसले जात आहे. कर्मचारी आक्रमक झाले असून यावर तोडगा निघाला नाहीतर यंदाचा गडावरील चैत्रोत्सव कसा होणार याबाबत चर्चा होऊ लागली आहे.