चैतन्य गायकवाड, टीव्ही 9 मराठी, नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडून भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यांच्यासोबत 40 आमदार असल्याच्या चर्चा सुरू असून राज्यातील सरकार कोसळण्यापूर्वी अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन होईल असे वृत्त एका वृत्तपत्रात आल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यावर स्वतः अजित पवार यांनी या चर्चेत कुठेलही तथ्य नसल्याचे म्हणत मी काही उत्तर द्यायला बांधील नाही असेही म्हंटलं होतं. याच पार्श्वभूमीवर काही आमदार हे आम्ही अजित पवार यांच्यासोबत असल्याचे म्हंटलं होतं. त्यावरच चर्चेतल्या महिला आमदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीच्या महिला आमदार सरोज अहिरे म्हणाल्या, अजित पवार जो काही निर्णय घेतील, यावर पक्षांतर्गत चर्चा करून निर्णय होईल. पण अजित पवार यांची मी खंदी समर्थक असली तरी शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर माझी पुढची भूमिका ठरवेल असं म्हंटलं आहे.
या सर्व जर तर च्या चर्चा आहे. जर अजित पवार यांनी भाजपसोबत जायची भूमिका घेतली, तर मी शरद पवार यांच्याशी विचार विनिमय करून माझी भूमिका घेईल. अजित पवार यांनी माझ्या मतदारसंघात भरपूर निधी दिला आहे. अनेक अर्थाने सपोर्ट देखील केला आहे.
राज्यपाल यांना 40 आमदारांच्या सहीचे असं कुठलंही पत्र दिलेले नाही. सोशल मीडियावर जुन्या गोष्टी उकरून काढल्या जातात. त्यामुळे हे पत्र जुनं आहे की, आताचे आहे, याबद्दल मला खात्री नाही असेही मत सरोज अहिरे यांनी व्यक्त केले आहे.
आपल्याला भाजपसोबत जायचं की नाही, याबाबत दादांनी मला कॉन्टॅक्ट केलेला नाही आणि शरद पवार यांनी नाही. अजित दादांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, ही नम्र विनंती. म्हणजे त्यानंतरच मलाही निर्णय घेता येईल असे सरोज अहिरे यांनी म्हंटलं आहे.
राष्ट्रवादीच्या महिला आमदार यांनी आपण पक्षासोबत आहोत असे म्हणत सरोज अहिरे यांनी अजित पवार की शरद पवार यांच्या बाजूने प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. दोन्ही बाजूने प्रतिक्रिया देत सरोज अहिरे यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.
खरंतर अजित पवार यांनी 2019 ला भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. त्यामध्ये 80 तासांतच अजित पवार यांचे बंड शरद पवार यांनी थंड केले होते. त्यावरून राज्यात पक्षातील निर्णयाबाबत शरद पवार हेच सर्व निर्णय घेतात असं बोललं जात होतं.
मात्र, त्यानंतर अजित पवार यांच्या बाबत कायम नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अजित पवार हे अस्वस्थ असल्याचेही बोलले जात असतांना आज एका वृत्तपत्रात आलेल्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.