नाशिक : गेल्या काही दिवसांपासून वादातीत असलेल्या टोळीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जात आहे. नाशिक शहरात बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्या चालकांना लगाम बसावा यासाठी टोइंगच्या माध्यमातून कारवाई केली जाते. काही महिन्यापूर्वी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त म्हणून अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुदतवाढ देण्यात आलेल्या टोइंगचा ठेका रद्द करण्यात आला होता. टोइंगच्या संदर्भात अनेक नागरिकांनी तक्रारी नोंदवर आक्षेप घेतला होता. त्यावरून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिककरांची टोइंगच्या कारवाईतून सुटका केली होती. मात्र दुसरीकडे बेशिस्त वाहन पार्किंग केल्यास ही चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय पुन्हा एकदा रद्द करून टोइंगच्या माध्यमातून बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर आता कारवाई केली जाणार आहे.
नाशिकमध्ये 2021 पासून शहरातील बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांना दंडात्मक कारवाई करण्याकरिता टोइंगचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर अनेकदा टोइंगच्या ठेक्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होते.
बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांबरोबरच सुस्थितीत पार्किंग मधीलही अनेक वाहनांवर टोइंगच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अनेकदा नागरिकांनी टोइंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला आहे.
महिला आणि टोइंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेकदा वाद झाला आहे. त्या वादाचे अनेक व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टोइंगच्या संदर्भात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता.
त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी टोइंगकहा ठेका रद्द करत नाशिककरांची टोइंगच्या कारवाईतून मुक्तता केली होती. मात्र त्यानंतर दीड महिना शहरात ई चलनाद्वारे बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली जात होती.
मात्र, कारवाईत काही अडचणी निर्माण होत असल्याने शहरात पुन्हा एकदा टोळीच्या माध्यमातून बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर टोइंगच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे. अवघ्या दीड महिन्यातच पोलीस आयुक्तांनी ई चलनाद्वारे दंडात्मक कारवाईचा घेतलेला निर्णय मागे घेण्याची वेळ आली आहे.
नाशिक शहरात आता बेशिस्त वाहन पार्किंगच्या संदर्भात पुन्हा एकदा टोइंगच्या माध्यमातून कारवाई होण्याची शक्यता अधिक आहे. याबाबत नव्या ठेकेदाराचा शोध देखील नाशिक पोलीस आयुक्तांच्या वतीने घेतला जाणार आहे.
येत्या काळात पुन्हा एकदा नाशिक शहरात टोळीच्या माध्यमातून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली जाणार हे. यामध्ये नागरिक आणि टोइंगच्या कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे