सिन्नर, नाशिक : सुरुवातीपासून सिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असं बोललं जात असतांना ते प्रत्यक्षात घडले आहे. यामध्ये विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांचा शेतकरी विकास पॅनल तर माजी आमदार राजभाऊ वाजे यांचा जनसेवा परिवर्तन पॅनल होता. तर भाजपा पुरस्कृत बळीराजा विकास पॅनल होता. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच कोकाटे यांच्याकडून सत्ता कायम ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात होते. तर दुसरीकडे माजी आमदार राजभाऊ वाजे यांच्या कडून परिवर्तन करत सत्ता खेचून आणण्याचा प्रयत्न होता. मात्र अखेरच्या क्षणापर्यन्त इंटरेस्टिंग झालेली निवडणूक यापुढे आणखी इंटरेस्टिंग होणार आहे. त्याचे कारण म्हणजे कोकाटे आणि वाजे गटाला समान 9 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपा पुरस्कृत पॅनलला एकही जागा मिळाली नाही.
सलग वीस वर्षापासून सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे सत्ता होती. त्यानंतर होऊ घातलेल्या निवडणुकीत ही सत्ता कायम आपल्याकडे राहावी यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात होते.
अशातच माजी आमदार राजाभाऊ वाजे आणि उदय सांगळे गटाने यंदाच्या निवडणुकीत सत्ता पालट करण्याचा चंग बांधला होता. तो जवळपास यशस्वी झाला आहे. 9 जागा मिळवत वाजे आणि सांगळे गटाने कोकाटे यांना धक्का दिला आहे. त्यामुळे सत्ता कुणाची येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आमदार माणिकराव कोकाटे यांच्या 9 जागा तर माजी आमदार राजभाऊ वाजे यांनाही 9 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, सामंज्यस भूमिका घेऊन समसमान सत्ता वाटप होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यात पद मिळवण्यासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता अधिक आहे.
खरंतर सिन्नर बाजार समितीची निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. त्यामध्ये अतिशय धक्कादायक निकाल आहे. आर्थिक दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या बाजार समितीचा आलेला निकाल पाहता उलट सुलट चर्चा होत असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोण कशी सत्ता आणेल याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहे.
माणिकराव कोकाटे यांना धक्कादेण्यासाठी आखलेली वाजे आणि सांगळे गटाची रणनीती जवळपास यशस्वी झाली आहे. त्यामध्ये चुरशीच्या झालेल्या निवडणूक समान जागा घेऊन नवा ट्विस्ट होण्याची शक्यता अधिक आहे. त्यात फडफोडीचे राजकारण आणि बेरजेचे राजकारण बघायला मिळणार आहे.
वाजे आणि सांगळे गटाने मत मोजणीवर आक्षेप घेतला होता. त्यावरून रात्री उशिरा हा निकाल आला असून निवडणूक टाय झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरत असून सत्ता कुणाची आणि कशी येते याकडे लक्ष लागून आहे.