Nashik | पोस्ट व्हायरल करायची अन्…शेलारांनी सांगितले ठाकरे सरकारचे टूलकिट

| Updated on: Feb 27, 2022 | 12:39 PM

शेलार म्हणाले की, अभिनव भारत ही वास्तू आणि सावरकर यांनी नेहमीच देशवासीयांना ऊर्जा दिली. मात्र, गेल्या विधिमंडळ अधिवेशन काळात सावरकरांची प्रतिमा राजमार्गाने आणता आली नाही. चोरमार्गाने ही प्रतिमा आणून तिचे पूजन करावे लागले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असे घडणे दुर्दैवी म्हणावे लागेल.

Nashik | पोस्ट व्हायरल करायची अन्...शेलारांनी सांगितले ठाकरे सरकारचे टूलकिट
आशिष शेलार आणि उद्धव ठाकरे.
Follow us on

नाशिकः गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवेसना विरुद्ध भाजप असा राजकीय सामना रंगलेला दिसतोय. किरीट सोमय्या यांनी आरोपाच्या फैरी झाडायच्या. त्याला संजय राऊतांनी उत्तर द्यायचे. हे सत्र संपते न संपते तोच आता आशिष शेलार (Ashish Shelar) आक्रमक झालेत. त्यांनी नाशिक (Nashik) दौऱ्यामध्ये ठाकरे (Thackeray) सरकारवर जोरदार टीका केली आणि त्यांचे टूलकिट सांगून टाकले. यावेळी शेलार म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारची मोड्स ऑपरेंडी (Modus operandi) ठरली आहे. त्यात एखाद्या व्यक्तीविरोधात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करायची. त्यातून बदनामी करायची. दुसरीकडे महिला आघाडीने करावाईची मागणी करायची. महापौरांनी महापौर म्हणून नाही, तर पक्षाच्या नेत्या म्हणून काम करायचे, असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला.

काँग्रेसचे वर्तन कसे, तर…

आशिष शेलार यांनी नाशिक दौऱ्यात अभिनव भारत मंदिर वास्तूच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते. त्यांचे वर्तन इंग्रजाच्या भावासारखे आहे. या काँग्रेसच्या समर्थनासाठी शिवसेनेने सावरकरांचे विचार आणि हिंदुत्व सोडल्याचा आरोपही त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये होते. त्यांनीही आता भगव्याची जबाबदारी फक्त भाजपच्या गळ्यात असल्याचे विधान केले होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्व कोणाचे, यावरूनही राजकीय वाद रंगलेला दिसतोय.

हे दुर्दैवी…

शेलार म्हणाले की, अभिनव भारत ही वास्तू आणि सावरकर यांनी नेहमीच देशवासीयांना ऊर्जा दिली. मात्र, गेल्या विधिमंडळ अधिवेशन काळात सावरकरांची प्रतिमा राजमार्गाने आणता आली नाही. चोरमार्गाने ही प्रतिमा आणून तिचे पूजन करावे लागले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असे घडणे दुर्दैवी असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. आता याला शिवसेनेतून कोण उत्तर देणार, याची उत्सुकता आहे.

ठाकरे सरकारची मोड्स ऑपरेंडी ठरली आहे. त्यात एखाद्या व्यक्तीविरोधात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करायची. त्यातून बदनामी करायची. दुसरीकडे महिला आघाडीने करावाईची मागणी करायची. महापौरांनी महापौर म्हणून नाही, तर पक्षाच्या नेत्या म्हणून काम करायचे.

– आशिष शेलार, भाजप नेते

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान