नाशिक: आपण व्यक्ती म्हणून समाजाचे काही तरी देणे लागतो, या उद्देशाने पिंपळगाव बसवंत येथील जैन समाज कोरोना बाधित रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना खऱ्या अर्थाने आधार ठरत आहे. जैन समाजाच्यावतीनं दोन वेळेचे मोफत जेवण देण्याचा अभिनव उपक्रम जैन समाजाच्या वतीने हाती घेण्यात आला. दिवसाकाठी दीडशे ते दोनशे रुग्णांना जेवणाचे डबे पोहोचवण्याचे काम सुरू असून आतापर्यंत साडेसात हजारहून अधिक जेवणाच्या डब्यांचे वाटप केले जात आहे. (Nashik Nifad Jain Community started free food service to corona patients and relatives at Pimpalgaon)
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव व परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे रुग्ण व नातेवाईकांचे जेवणाचे हाल होत होते. हे पाहून पिंपळगाव बसवंत येथील जैन समाज बांधवांनी एकत्र येत गेल्या महिन्याभरापासून अन्नदानाचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. दिवसाकाठी दीडशे ते दोनशे रुग्णांना जेवणाचे डबे पोहोचवण्याचे काम सुरू असून आतापर्यंत साडेसात हजारहून अधिक जेवणाच्या डब्यांचे वाटप केले, असल्याची माहिती अल्पेश पारेख यांनी दिली. जैन समाज बांधवातर्फे राबवण्यात येत असलेल्या उपक्रमाचे वैद्यकीय क्षेत्रातून ही स्वागत करण्यात येत असल्याचं डॉ. चेतन काळे यांनी सांगितलं.
नाशिक जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका निफाड आहे. कोरोनाबाधित रुग्ण पिंपळगाव बसवंत येथे उपचारासाठी येत असतात. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने रुग्ण व नातेवाईकांचे जेवणाचे खूप मोठे हाल होत होते. जैन समाज बांधवांनी गेल्या महिनाभरापासून जेवणाची सोय केल्यानं रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय टळली असल्याचं भरत पवार यांनी सांगितलं.
SSC Exam | दहावीबाबत शिक्षण विभाग काढणार जीआर, 10वी उत्तीर्ण, 11वी प्रवेशाचे निकष ठरणार#sscexam | #Maharashtra https://t.co/YIOvCsY26C
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2021
हेही वाचा:
दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचा नवा स्ट्रेन महाराष्ट्रात, अमरावतीत चार रुग्ण, धोका वाढला
(Nashik Nifad Jain Community started free food service to corona patients and relatives at Pimpalgaon)