नाशिक : संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना नाशिकमध्येही कोरोनाचे अधिक संख्येने रुग्ण मिळत आहेत. काल एकाच दिवसांत (सोमवार) शहरात 224 कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे नाशिककरांची धाकधूक वाढली आहे. (Nashik Night Curfew Corona Cases Increasing)
काल सोमवारी एकाच दिवशी नाशिकमध्ये 224 रुग्ण मिळाले. गेल्या काही दिवसांतली ही मोठी वाढ आहे. त्यामुळे सध्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही जवळपास 2 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये सध्या 1941 रुग्ण उपचार घेत आहेत.
नाशिक शहरात कोरोनाचं संक्रमण वाढलं आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांचं प्रमाण वाढतं आहे. असं असलं तरी सध्या शहरात लॉकडाऊन लावणार नाही मात्र कठोर निर्बंध लावणार लावले गेले आहेत. शहरात नाईट कर्फ्यूची कडक अंमलबजावणी सुरु झाली आहे.
शहर पोलिसांकडून शहरात मध्यरात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. रात्री 11 नंतर घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येतीय. अत्यावशक सेवा वगळून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई येत आहे. शहराच्या सातपूर, सिडको, पंचवटी, नाशिक रोड, द्वारका भागात नाकाबंदी करत पोलीस कारवाई करत आहेत.
राज्यातील वाढत्या कोरोनाचा कर्नाटक सरकारने घेतला धसका घेतलाय. ओझर विमानतळावरुन (Nashik Ozar Airport) कर्नाटकात जाणाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी होणार आहे. ओझर विमानतळावरुन बंगळूर, बेळगावला विमानाने जाणाऱ्यांची तसापणी होणार आहे. महाराष्ट्र राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कर्नाटक सरकारने सावध पावले टाकत कठोर निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच कर्नाटकात प्रवेश मिळणार आहे. तसंच रिपोर्ट 72 तासांपेक्षा जुना नसावा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
(Nashik Night Curfew Corona Cases Increasing)
हे ही वाचा :
नागपुरातील मंगल कार्यालयात 8 लोकं कोरोनाग्रस्त, हॉलला पोलिसांनी ठोकलं टाळं, कन्टेन्मेट झोन घोषित