नाशिक: नाशिक महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये ऑक्सिजन टँकमधून गळती सुरु झाल्यानं प्राणवायू अभावी 25 जणांना जीव गमवावा लागला आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये झालेल्या दुर्घटनेची महाराष्ट्रासह देशभर दखल घेतली गेली. ऑक्सिजन टँकला गळती कशी लागली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज टीव्ही 9 मराठीच्या हाती लागले असून, नेमकी गळतीला कशी सुरुवात झाली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Nashik oxygen leak incident CCTV video at Dr. Zakir Hussain hospital at nashik Maharashtra in this twenty five people died)
11:55 मिनिटं :
पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील, लिक्विड ऑक्सिजन टॅन्कमध्ये, ऑक्सिजन रिफिल करणारा टँकर पोचला
12:03 मिनिटं:
ऑक्सिजन टँकरमधून,या झाकीर हुसेन रुग्णालयातील,ऑक्सिजन टॅन्कमध्ये,ऑक्सिजन रिफिल करण्यासाठी, पाईप जोडणीला सुरुवात
12:12 मिनिटं:
टॅन्कमध्ये ऑक्सिजन भरण्यास सुरुवात, इनलेट कॉकजवळ प्रेशर वाढलं.गळतीला सुरुवात
12:13 मिनिटं:
अवघ्या 1 मिनिटात,प्रेशरचा दाब प्रचंड वाढला.लिक्विड गॅस झपाट्यानं बाहेर पडायला सुरुवात.
12:14 मिनिटं:
पाहता पाहता, धुकं सदृश्य लिक्विड ऑक्सिजनचे अक्षरशः लोट, सर्व परिसरात पसरलं धुकंच धुकं.
12:15 मिनिटं:
रुग्णालयात पुरवठा होणारा, ऑक्सिजन पुरवठा खंडित
12:16 मिनिटं:
अग्निशमन यंत्रणेला रुग्णालय व्यवस्थापनानं दिला कॉल
12:25 मिनिटं:
अवघ्या 9 मिनिटात,अग्निशमन जवानांची टीम दाखल
12:26 मिनिटं :
पाण्याची फवारणी सुरू
12:28 मिनिटं :
मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी,प्रोटेक्ट मास्क लावून धुक्यात प्रवेश केला,गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू
12:30 मिनिटं :
गळती होत असलेला नॉब सापडला
12:32 मिनिटं :
गळती रोखण्यात यश
12:34 मिनिटं :
रुग्णालयात पोचणारा,लिक्विड ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू
12:46 मिनिटं :
पुरवठा सुरळीत करण्यात काही प्रमाणात यश,मात्र प्रेशर नियंत्रण राखण्यासाठी धडपड सुरू
12:47 मिनिटं :
अखेर प्रेशर नियंत्रणात आलं
ऑक्सिजन टँकच्या नॉबमधून गळती झाली होती. तो नॉब पूर्ववत करण्यामध्ये एकूण 32 मिनिटांचा कालावधी गेला. या सगळयामध्ये तोपर्यंत ऑक्सिजन अभावी 22 रुग्णांना जीव गमवावा लागला. तर त्याच वार्डमधील आणखी तिघांचा त्यानंतर मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 25 वर पोहोचली आहे.
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालायतील ऑक्सिजन गळतीमुळे जीव गमावेल्या व्यक्तींच्या वारसांना 5 लाखाची मदत जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावेळीच त्यांनी घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती.
संबंधित बातम्या:
(Nashik oxygen leak incident CCTV video at Dr. Zakir Hussain hospital at nashik Maharashtra in this twenty five people died)