लासलगावः हिरवाईने नटलेल्या, झाडांनी सजलेल्या सन्मित्र नीलेश चव्हाण उद्यानाचा पाचवा वाढदिवस आकर्षक विद्युत रोषणाईत लासलगाव जवळील निफाड तालुक्यातील विंचूर येथे साजरा करण्यात आला.
एकीकडे निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे, अशा परिस्थितीत झाडे लावण्याचे आवाहन केले जाते. मात्र, झाडे लावून नुसता उपयोग नाही, तर त्याचे संगोपन करणे काळाची गरज आहे. असाच काहीसा उपक्रम निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील विंचूर येथे हिरवाईने नटलेल्या, झाडांनी सजलेल्या सन्मित्र नीलेश चव्हाण उद्यानाचा पाचवा वाढदिवस साजरा करून राबविण्यात आला. यावेळी झाडांच्या भोवती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या उद्यानात बुच, तामण, स्पॅथोडिया, सुरुची अशी असे १०० मोठे वृक्ष पाच वर्षांपूर्वी लावले होते. ती आता बहरली आहेत. आरेका, पाम, जेटरोपा, मिनी इक मिनी इरेका गोल्डन, डुरंटा, अरेथमम फिनिक्स पाम् मोरपंखी अशाप्रकारची शोभेची झाडे लावलेली आहे. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक तयार केलेला आहे. व्यायामासाठी ग्रीन जिमची विविध उपकरणे बसवलेली आहेत. या उद्यानाची दैनंदिन साफसफाई, शोभेच्या झाडांची वेळोवेळी करावी लागणारी कटिंग, पाणी देणे, तणनाशक औषध फवारणी ही सर्व कामे परिसरातील नागरिक करतात.
मानव बिबट्या सहजीवन केंद्र
निफाड येथे एक हेक्टर परिसरात मानव बिबट्या सहजीवन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या उद्यानामध्ये प्राणिमात्रांचा अधिवास दाखविण्यात आला आहे. एक हेक्टरमध्ये उभारण्यात आलेल्या या उद्यानातल्या चिल्ड्रन पार्कमध्ये विविध खेळणी बसविण्यात आली आहेत. विविध सापांच्या जातींची माहिती देण्यासाठी रोटन पार्क (सर्प जाती माहिती केंद्र), निफाड मानव बिबट संघर्ष माहिती केंद्र, ताडोबाचा वाघ, नांदूरमध्यमेश्वर परिसंस्था, ममदापूर राखीव संवर्धन परिसंस्था, फुलपाखरू गार्डन, राशी वन, ग्रीन जिम, औषधी वनस्पती असे सुंदर उद्यान याठिकाणी उभारण्यात आले आहे. अतिशय कमी वेळात व कमी खर्चात उभारण्यात आलेल्या या आकर्षक व माहितीपूर्ण उद्यान निमिर्तीसाठी वन विभागतील अधिकारी व कर्मचारी यांचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त करून कौतुक केले आहे.
इतर बातम्याः
गब्बर कांदा व्यापाऱ्यांचे कारनामेः 100 कोटींचा ब्लॅकमनी जमीन खरेदीत, नाशिकमधले 26 जण रडारवर
ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाशिक महापालिकेत नोकर भरतीचा बार; आयटी हब, लॉजिस्टिक पार्कसाठी जोर
Health Tips : तुम्हीही चहाचे शौकीन आहात? तर ‘ही’ खास बातमी तुमच्यासाठीच!https://t.co/nbP80T6L3H | #HealthTips | #Tea | #sideeffects | #Healthcare | #Healthcaretips | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 26, 2021