चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नाशिक | 02 डिसेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कर्जतमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेबाबत मोठे गौप्यस्फोट केले. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार बोलताय ती भाजपची स्क्रिप्ट आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना ठरविण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. चारित्र्यहनन करत आहेत. खोटे आरोप अल कायदा टेरेर्स काम करत होती तसे भाजप करत आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
भाजपने पक्ष आणि घर फोडली आहेत. आता नेते तुटत नाहीत. म्हणून चारित्र्यावर हल्ला केला जातोय. अजित पवार आणि शिंदे गटाने त्यांचा मार्ग निवडला. त्यांनी तसं जावं. सध्या अजितदादा नाही बोलत नाहीत. तर भाजप बोलतंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रच्या अस्मितेसाठी काम करणारे पक्ष आहेत. या पक्षांना भाजप संपवू पाहात आहे. पण तसं होणार नाही. राज्यातील जनता आमच्यासोबत आहे. भविष्यात महाराष्ट्रात आणि देशात आमचं सरकार येईल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
बारामतीसह अन्य ठिकाणी लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा काल अजित पवार यांनी केली. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ती अजित पवार यांची भूमिका आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना संपवण्याण्यासाठी भाजपकडून षड्यंत्र रचलं जात आहे. संघाचं हे कारस्थान आणि कपट आहे, असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे.
मला कधीही अटक होऊ शकते, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. यावरही राऊत बोलले. सरकार कुणालाही अटक करेल. कायद्याने अडवता येत नाही, म्हणून व्यक्तिगक हल्ले केले जातात. त्यांच्या समाजासाठी ते काम करत आहे. जरांगे सरकारला धोकादायक वाटतात. जे लोक यांना कायद्याने आवरता येत नाहीत. त्यांना हे अटक करण्याचं अस्त्र उगरतात, असं म्हणत राऊतांनी घणाघात केलाय.
प्रफुल्ल पटेल यांच्या आरोपांवर राऊतांनी प्रतिक्रिया दिलीय. राजकारण आम्हाला पण कळतं. शरद पवारसाहेब गेले का कुठे? पवारसाहेब पुरोगामी महाराष्ट्राचे नेते आहेत. शिंदे आणि अजित पवार यांचे आरोप ही भाजप स्क्रिप्ट आहे. असं राऊत म्हणालेत.