नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अंबड महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार होणाऱ्या सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तात्काळ सुरुवात करावी, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दिले आज बुधवारी, 2 फेब्रुवारी रोजी दिले. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेवून गोदावरीचे प्रदूषण होऊ नये यासाठी या प्रकल्पाचे काम गतीने व्हावे, अशी मागणी अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या बैठकीत केली. मंत्रालयातील दालनात मंत्री सुभाष देसाई आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अंबड महाराष्ट्र औद्योगिक वसाहत येथे सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई बोलत होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, सहसचिव अजित पाटील, नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव, सहसचिव संजय देंगावकर, वैज्ञानिक अधिकारी डॉ. अमर सुपाते, मुख्याधिकारी एस. आर. तुपे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
अहवालानुसार काम
बैठकीत मंत्री देसाई म्हणाले, अंबड महाराष्ट्र औद्योगिक वसाहत नाशिक येथे होणाऱ्या सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत वैज्ञानिक अधिकारी डॉ. सुपाते यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने अनुकूल अहवाल दिला आहे. या अहवालातील सूचना लक्षात घेवून औद्योगिक विकास महामंडळाने त्याप्रमाणे कार्यवाही करावी. कोणत्याही प्रकारे या कामात दिरंगाई न करता शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना यावेळी देसाई यांनी केल्या.
वेळेत प्रकल्प पूर्ण करा
बैठकीत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अंबड महाराष्ट्र औद्योगिक वसाहत नाशिक येथे होणाऱ्या सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम होताना नदीतील पाण्याचे प्रदूषण होता कामा नये. तसेच नदीच्या पाण्याच्या शुद्धता रहावी यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. कारण हा प्रश्न लोकांच्या आरोग्याशी संबधित आहे. हा प्रकल्प राबविणाऱ्या यंत्रणांनी कामाला प्राधान्य द्यावे. दिलेल्या वेळेत हा प्रकल्प पूर्ण करताना वैज्ञानिक अधिकारी डॉ. सुपाते यांच्या समितीने दिलेल्या सूचनांचेही पालन केले जावे, असे आवाहन त्यांनी केले.
Nashik | प्रारूप प्रभाग रचनेत धक्क्यावर धक्के, अनेक नगरसेवक गॅसवर; महापौरांनाही जोर का झटका धीरे से…
टेन्शन खल्लास, नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल मुलांचे आधार कार्ड; काय आहे योजना?
Nashik | ‘महाडीबीटी’ पोर्टल संथ, विद्यार्थी हैराण; शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?