नाशिक : नाशिक (Nashik) शहरात मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडलीयं. तब्बल 27 किलो चांदीवर दरोडा पडल्याने एकच खळबळ निर्माण झालीयं. चांदीचे पार्सल पुणे आणि औरंगाबादला (Aurangabad) पोहचवण्यासाठी कुरिअर बॉय बस स्थानककडे जात असताना ही घटना घडली आहे. कुरिअर बॉयला चोरट्यांकडून मारहाण देखील करण्यात आलीयं. 27 किलो चांदीसोबतच चोरट्यांनी कुरिअर बॉयची (Courier boy) गाडी देखील लंपास केलीयं. रात्री पावणे बाराच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळतंय. सीबीएस परिसरातील बाल सुधारालय समोर हा सर्व प्रकार घडल्याने आर्श्चय व्यक्त केले जातंय.
नाशिक शहरात रात्री पावणे बारादरम्यान 27 किलो किलो चांदीवर दरोडा पडलायं. तसेच यावेळी कुरिअर बॉयला देखील मारहाण करण्यात आलीयं. कुरिअर बॉय पुणे आणि औरंगाबादला पार्सल पोहचवण्यासाठी बस स्थानककडे जात असताना पाच जणांनी मिळून पार्सल कंपनीचा कर्मचारी अमित सिंहला अडवत मारहाण करून 27 किलो चांदी लंपास केलीयं. हे पाच चोरटे दुचाकीवरून आले होते.
हा चोरीचा सर्व प्रकार सीबीएस परिसरातील बाल सुधारालय समोर घडलायं. दोन वाहनांवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी अमित सिंहला मारहाण देखील केलीयं. एकाने डोक्याला पिस्टल लावताच अमित सिंह यांचे साथीदार घटना स्थळीवरून पळून गेले. 27 किलो चांदीसह ॲक्टिवा गाडी घेऊन दरेडोखोर पसार झाले. एकूण 12 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आलायं. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.