नाशिक : नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री जवळपास सर्वच ठिकाणी अवकाळी तसेच अस्मानी पावसाने हजेरी लावली. या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आणल्याची स्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील 135 गावांमध्ये सुमारे 2 हजार 433 शेतकऱ्यांचे उभ्या पिकावर पाणी फिरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळपास 2 हजार 685 हेक्टरवरील द्राक्षे, कांदा, गहू असे पीक डोळ्यांदेखत नष्ट झाल्याने शेतकरी (nashik farmer) हवालदिल झाले आहे. आधीच नाशिक जिल्ह्यातील शेतकरी शेतीमालाला भाव मिळत नसल्याने संघर्ष करत होते. त्यातच अवकाळी पाऊस (rain) आल्याने बळीराजाचे कष्ट मातीमोल झाले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पुढचे दोन दिवस हवामान खात्याने पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. काही जिल्ह्यात पावसाची चांगलाचं धुमाकूळ घातला असून पीकाचं मोठं नुकसान झालं. रब्बी हंगामातील काढणाीला आलेली पीकं पुर्णपणे खराब झाल्याचं शेतकरी सांगत आहेत. त्याचबरोबर तात्काळ पंचनामा करुन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी सुध्दा शेतकरी वर्गातून होत आहे.
द्राक्षांच्या बागांचं अधिक नुकसान झालं असून बागा पुर्णपणे उद्धवस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
नागपूरसह संपूर्ण विदर्भात हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरण निर्माण झाला आहे. त्यामुळे होळीच्या उत्साहावर पावसाच सावट का अशा प्रकारचे चित्र निर्माण झालं असून होळीच्या दिवशी पाऊस येणार का याकडे लक्ष लागला आहे. नागपुरात मध्यरात्री हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या असल्याने सकाळी वातावरणात गारवा निर्माण झाला आणि सर्वत्र ढगाळ वातावरण सकाळपासूनच पाहायला मिळते आहे. हवामान विभागाने सुद्धा दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे होळीच्या उत्साहावर पावसाचं सावट येणार का याकडे होळी साजरी करणाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.