Nashik Oxygen Tank Leak : नाशिकमध्ये ऑक्सिजन अभावी तब्बल 22 जणांचा मृत्यू, आदित्य ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले…

| Updated on: Apr 21, 2021 | 3:57 PM

ज्य सरकारवर कठोर टीका होत असताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. (aditya thackeray nashik oxygen tank leak)

Nashik Oxygen Tank Leak : नाशिकमध्ये ऑक्सिजन अभावी तब्बल 22 जणांचा मृत्यू, आदित्य ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
ADITYA THACKERAY ON NASHIK OXYGEN
Follow us on

मुंबई : राज्यात सगळीकडे कोरोनाने हाहा:कार माजवलेला आहे. सगळीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर एक अतिशय गंभीर घटना घडली आहे. नाशिकमधील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात (Nashik Zakir Hussain hospital )ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे ऑक्सिजन अभावी तब्बल 22 कोरोनाग्रस्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना घडल्यानंतर राज्य सरकारवर कठोर टीका होत असताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ही घटना दुर्दैवी असून याची सखोल चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे. (Aditya Thackeray comment on Nashik Zakir Hussain hospital Oxygen tank leak 22 Corona patient died incident said will order to investigate matter)

आदित्य ठाकरे काय म्हणाले ?

नाशिक येथे ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे तब्बल 22 जणांचा मृत्यू झालाय. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीये. ट्विटच्या माध्यमातून “नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सगळेच या सर्व कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहोत. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि सर्व अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी केली जाईल,” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

टँकरमधील व्हॉल लीक झाल्यामुळे ही घटना घडली- राजेश टोपे

नाशिकमध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे डॉ. तब्बल 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही घटना नेमकी का घडली याबद्दल सांगितलं आहे. “ऑक्सिजन टँकरमधील व्हॉल लीक झाल्यामुळे ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे स्थानिक प्रशासनाने कळवलं आहे,” असे टोपे यांनी सांगितलंय.

निरपराध रुग्ण दगावल्याचे दु:ख- भगतसिंह कोश्यारी

नाशिक येथील ही घटना घडल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीसुद्धा तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. “नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन काही निरपराध रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आपल्या शोक संवेदना कळवतो. तसेच बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो,” असे राज्यपाल म्हणाले.

नाशिकमध्ये नेमके काय घडले ?

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमध्ये टँकरमधून ऑक्सिजन भरायचे काम सुरु होते. ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनानं धावपळ केली. मात्र, यावेळी रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना याचा त्रास झाला आणि यामध्ये 22 जणांना जीव गमावावा लागला.

इतर बातम्या :

Nashik Oxygen tanker leakage Live Updates : ऑक्सिजन गळती दुर्घटना, मृतांची संख्या वाढली, 22 जणांचा मृत्यू झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Nashik Oxygen Tank Leak Video : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, तब्बल 22 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

केंद्र सरकारची कपटनीती; महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेस ट्रेनचा खोळंबा: अरविंद सावंत

(Aditya Thackeray comment on Nashik Zakir Hussain hospital Oxygen tank leak 22 Corona patient died incident said will order to investigate matter)