Ajit Pawar : राज्याचा नावलौकिक…उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर अजितदादांचे मोठे वक्तव्य

| Updated on: Aug 11, 2024 | 1:12 PM

Ajit Pawar on Udhav Thackeray : बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकल्यानंतर त्याचे पडसाद शनिवारी ठाण्यात दिसून आले. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ फेकण्यात आला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशी प्रतिक्रिया दिली.

Ajit Pawar : राज्याचा नावलौकिक...उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर अजितदादांचे मोठे वक्तव्य
अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

राज्यात सध्या राजकारण तापले आहे. बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकण्यात आली. त्यानंतर त्याचे पडसाद ठाण्यात दिसले. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ फेकून मारण्यात आला. या वादावर राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणावर मोठे वक्तव्य केले आहे. काय म्हमाले अजितदादा?

राजकारणाचा स्तर ढासाळतोय

खरंतर राजकारणाचा स्तर हा दिवसेंदिवस ढासाळत चालला आहे. या सगळ्या संदर्भात म्हणूनच मी ठरवलेलं आहे मी जनसमान यात्रा सुरू केल्यापासून तुम्ही बघताय माझी भूमिका काय म्हणतोय मी, मी अशी काय बोलतोय मी माझ्या सभेमध्ये काय सांगतोय हे आपण सगळेजण बघताय त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीने महाराष्ट्र मध्ये कधीच माग घडले नव्हतं जे आता घडतंय ते अक्षरशः महाराष्ट्राचा नावलौकिक खराब करणाऱ्या गोष्टी आहेत.

हे सुद्धा वाचा

ह्या ज्या सर्व राजकीय पक्षांनी सत्ताधारी विरोधी पक्षाने सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे याच्याबद्दल विचार केला पाहिजे आणि ह्या ज्या ज्यांच्याकडे ज्या ज्या पक्षांच्याकडनं किंवा त्या पक्षाच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या कडन चुका होत आहेत त्या चुका ताबडतोब थांबवल्याच पाहिजे, असे आवाहन अजितदादांनी केले.

एका पक्षाचे सरकार नाही

राज्यात एकाच पक्षाची सत्ता येईल, अशी सध्या राजकीय स्थिती नाही. 1995 पासून शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी सरकारं आली. एका पक्षाच्या हातात कधी राज्यात सत्ता आली नाही. ममता बॅनर्जी, स्टॅलिन, अरविंद केजरीवाल यांनी एकहाती सत्ता आणली आहे. पण राज्यात अशी स्थिती नाही. राज्यात एका पक्षाचे सरकार येईल अशी स्थिती नसल्याचे अजितदादांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं

मराठा आरक्षणावर अजित दादांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं आपलं स्पष्ट मंत असल्याचे अजितदादा म्हणाले. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली होती. त्याला काही पक्ष उपस्थित नव्हते. आता लोकसभा, राज्यसभेचे अधिवेशन संपणार आहे. सरकारने पुन्हा मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावावी. त्यात सर्वांची बाजू ऐकून घ्यावी. मराठा समाजावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेऊन निर्णय घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.