नाशिक : औरंगाबादेत काल राज ठाकरेंची (Raj Thackeray) सभा पार पडली आणि त्यांनी पुन्हा जातीय राजकारणाचा आरोप करत पवारांना (Sharad Pawar) टार्गेट केले. तसेच पवारांनी मुद्दाम बाबासाहेब पुरंदरेंना त्रास दिल्याचाही आरोप केला. तसेच जेम्स लेनच्या मुलाखतीचा संदर्भ देत जोरदार हल्लाबोल चढवला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेतेही पेटून उठले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून राज ठाकरेंवर जोरदार टीका होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज नाशिकमध्ये बोलताना राज ठाकरेंचा त्यांच्या स्टाईलने समाचार घेतला आहे.विष कालवणाऱ्या माणसाने काय काम केलं ? साधी दूध सोसायटी नाही काढली पठ्ठयाने, एक खरबूज , टरबूज सोसायटी देखील नाही, संस्था चालवण्यास डोकं लागतं. धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही, असे म्हणत राज ठाकरेंच्या कालच्या टीकेचा अजित पवारांनी समाचार घेतला आहे.
तसेच राज ठाकरेंचं जेवढं वय नाही तेवढं शरद पवारांचं राजकारण झालं आहे, असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे. योगींनी मस्जिद आणि मंदिराचे भोंगे देखील बंद केले. साई मंदाराची आरती देखील पहाटे 6 च्या अगोदरे होते. जागरण गोंधळण देखील उशिरा होते. जत्रा, ऊरूस चालू आहेत. विरंगुळा म्हणुन कार्यक्रम होतात. पोलिस देखील उटसूट काही कारवाई करत नाहीत. यांच्या सभा रात्री होतात, सभा दुपारी घेतली का? असा सवालही अजित पवारांनी केला आहे. तसेच सध्या राजकारण विचित्र दिशेने सुरू आहे. राजकीय स्वार्थ म्हणून समाजात फुट पाडण्याचे काम करताना यांनी छत्रपतींच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी केला. पवार फुले, शाहू, आंबेडकर तसेच छत्रपतींच्या विचाराने काम करतात. आमच्या नसानसात छत्रपती आहेत, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
तसेच कोण तुकडोजी आम्हाला विचारतो, तुमची भाषणं म्हणजे नुसती नोटंकी, तुम्ही नकलाकार की भाषण करायला आले? असा सवालही अजित पवारांनी राज ठाकरेंना केला आहे. फक्त अजित पवारच नाही तर इतरही नेते राज ठाकरे यांच्यावर तुटून पडत आहे. सध्या राष्ट्रवादी विरुद्ध मनसे असा संघर्ष पेटला आहे. शरद पवार हे कधी शिवाजी महाजांचं नाव घेत नाही, ते नेहमी शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घेऊन राजकारण करतात. शाहू, फुले, आंबेडकरांचा तर महाराष्ट्र आहेच, पण सर्वात आधी आमच्या छत्रपतींता महाराष्ट्र आहे, तुमच्या सभेच्या स्टेजवर कधी फोटोही महाराजांचा ठेवत नव्हता, आता मी बोलायला लागल्यावर ठेवायला लागले, अशी जहरी टीका काल राज ठाकरेंनी केली होती, त्यालाच आज अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.