नाशिकच्या येवला मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचं लक्ष होतं. 26 हजार 681 मतांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ विजयी झाले आहेत. तर शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांचा पराभव झालेला आहे. विजयानंतर फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशाच्या गजरात भुजबळांच्या विजयाचा जल्लोष केला आहे. जेसीबीतून छगन भुजबळांना हार घातला गेला आहे. फुलांची देखील उधळण करण्यात आली आहे. भुजबळ समर्थकांचा येवल्यातील भुजबळांच्या संपर्क कार्यालयाबाहेर आनंदोत्सव पाहायला मिळत आहे. ओपन जीपमधून भुजबळांच्या विजयाची रॅली काढण्यात येत आहे. यावेळी भुजबळांनी संबोधित केलं. शायरी बाद मैं करेंगे, शेर तो आ गया है, असं यावेळी भुजबळ म्हणाले.
महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांनी चांगले निर्णय घेतले. त्याचा परिणाम या निवडणुकीत झाला आहे. आमच्या लाडक्या बहिणींनी ही निवडणूक जिंकवली, असं छगन भुजबळ म्हणालेत. येवल्यात आम्हाला 55 56 हजारांचे मताधिक्य मिळायचे. आमचं मताधिक्य घटले, आमचे मित्र जातिवादाचा प्रचार केला, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंना टोला लगावला आहे.
महाराष्ट्रात जातीवादाला थारा नाही, लोकांनी इभ्रत आमची राखली. दलित, ओबीसी आणि मुस्लिम समाज पाठीमागे उभे राहिले. मराठा समाजाच्या मराठा नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांना थोडेफार यश मिळाले, अधिक यश मिळाले नाही. स्वकियांसोबत त्यांना अडचणी आल्या. नातेसंबंध अडचणी आल्या पण ते मागे हटले नाहीत. वाईट वाटले, प्रचंड विकासाचे कामे झाले होते. त्या विकासासाठी त्रासले होते ते जातीवादाला थारा न लागू देत उभे राहतील असे वाटले होते पण थोडेफार लोक सोबत राहिले, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
भाजपसह इतर पक्षांनी जाणीवपूर्वक लक्ष घातले, 28 हजार काय विजय हा विजय असतो. विकासाचे आणि मागासवर्गीयांचे संरक्षण करण्याचे काम मी सुरूच ठेवणार आहे. मुस्लिम धर्माच्या लोकांनी इथं येऊन माझ्यासाठी आवाहन केलं. लाडक्या बहिणींमुळे विजय प्राप्त झाला. माझ्या सोबत काही आले त्यांना त्रास झाला, शारीरिक त्रास झाला तरी सोबत राहिले. फडणवीस यांच्यावर आमचे मित्र आग ओकत होते. फडणवीस यांना शिव्या घालत होते, भाजप महाराष्ट्रात कधीही इतक्या जागा मिळाल्या नाही, त्या मिळाल्या, असं भुजबळ म्हणाले.
आमच्या मित्राने लक्षात ठेवावे, महाराष्ट्रात असे होणार नाही. जे बोलत होते त्यांचा सुपडा साफ झाला, माझ्या जिथं सभा व्हायचे तिथे गोंधळ करायचे. इथं विकासाचा फॅक्टर चालला, सर्व मागासवर्गीय एक जुटीने उत्तर दिले, मराठा समाजाच्या लोकांनी सांगितले होत जातीवाद करू नका. ज्यांची 10 घरे नाही त्यांना इथं आमदार केलं होतं. कोणी कितीही जातीवादाचे विष पेरण्याचे प्रयत्न केला तर आंबेडकरांच्या महाराष्ट्रात चालत नाही. पवार साहेबांचा उमेदवार होता म्हणून ते आले, त्यांच्या बद्दल वावगं वाटत नाही, असं भुजबळांनी म्हटलं आहे.